दमदार इंजनमुळे रॉयल इन्फिल्ड ही क्रुझिंग आणि हिंमालयन राइड्ससाठी पसत केली जाते. भारतात या बाईकचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. दरम्यान रॉयल इन्फिल्डसाठी ऑगस्ट महिना हा खूप यशस्वी ठरला आहे. कंपनीला वार्षिक ५८.६४ टक्के आणि मासिक ३३.२१ वाढ मिळाली आहे. या यशात कंपनीने नवीनच लाँच केलेल्या हंटर ३५० या वाहनाचा मोठा वाटा आहे. मात्र, अधिक विक्रीच्या बाबतीत क्लासिकने शर्यत जिंकली आहे.

क्लासिक ३५० च्या १८ हजार ९९३ युनिटची विक्री

ऑगस्ट महिन्यात सर्वात अधिक विक्री होणारी बाईक ही रॉयल इन्फिल्ड क्लासिक ३५० ठरली आहे. बाईकच्या १८ हजार ९९३ युनिटची विक्री झाली आहे. मात्र तिला १९.०२ टक्क्यांच्या वार्षिक घट्याला देखिल तोंड द्यावे लागले आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये या बाईकच्या २३ हजार ४५३ युनिटची विक्री झाली होती. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विक्री कमी झाली आहे. क्लासिक ३५० चा ३०.६४ टक्के इतका मार्केट शेअर आहे.

(आता सर्व्हिस सेंटरवर कार नेण्याची गरज नाही, ‘या’ कंपनीने लाँच केली घरपोच वाहन दुरुस्ती सेवा)

हंटर ३५०

अलिकडेच कंपनीने हंटर ३५० लाँच केली आहे. कंपनी नव्या बाईकमध्ये काय नवीन फीचर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान कंपनीसाठी आनंदाची बातमी म्हणजे, ऑगस्ट २०२२ या महिन्यात या बाईकच्या १८ हजार १९७ युनिटची विक्री झाली आहे. क्लासिकच्या तुलनेत हंटर केवळ काही युनिटच मागे आहे. तिचा मार्केट शेअर २९.३६ टक्के इतका आहे. लोकांना ही बाईक पसंत पडत असल्याचे यातून दिसून येत आहे. या बाईक समोर कंपनीचे इतर मॉडेल फार काही प्रभाव पाडू शकले नसल्याचे दिसून येते.

मेटियोर ३५० चा जोरदार कमबॅक

गेल्या महिन्यात मेटियोरच्या ९ हजार ३६२ युनिटची विक्री झाली होती. हंटर आणि क्लासिकपेक्षा तिची विक्री कमी असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत तिच्या विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केवळ ६ हजार ३८१ युनिटची विक्री झाली होती.

(५ स्टार रेटिंग असलेल्या ‘या’ एसयूव्हीची कमाल, ४ लाख युनिट उत्पादनाचा टप्पा पार, नव्या व्हेरिएंटमध्ये दिले हे अप्रतिम फिचर)

बुलेट ३५०

ऑगस्ट महिन्यात बुलेट ३५० च्या केवळ ७ हजार ६१८ युनिट्सची विक्री झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा आकडा अधिक आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केवळ ३ हजार ६६९ युनिटची विक्री झाली होती.

हिमालयन

इतरांच्या तुलनेत हिमालयनची विक्री कमी आहे. ऑगस्ट महिन्यात या बाईकच्या केवळ २ हजार ३२० युनिट्स विकल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा फार कमी आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये बाईकचे २ हजार ७७० युनिट विकल्या गेले होते.

(इर्टिगाचे नवे अवतार आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच, ‘या’ कॅमेऱ्याची जोरदार चर्चा, कारच्या सुरक्षेसाठी दिले हे फिचर)

दरम्यान इलेक्ट्रिक ३५० चे ४ हजार १०४ युनिट विकल्या गेले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केवळ १ हजार ९६३ युनिट विकल्या गेले होते. तसेच, ६५० ट्विन्सचे ऑगस्ट २०२२ मध्ये १ हजार ३८८ युनिट विकल्या गेले. २०२१ मध्ये ऑगस्ट महिन्यात ८३४ युनिट विकल्या गेले होते. त्या तुलनेत आकडा वाढला आहे. एकंदरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.