Hero MotoCorp देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर निर्माता कंपनीपैकी एक आहे. या कंपनीकडे स्कूटर आणि बाइकची मोठी रेंज आहे.  Hero MotoCorp ची सर्वाधिक विक्री होणारी स्प्लेंडर प्लस बाईक आहे. मायलेज बाइक्सच्या उपलब्ध रेंज पैकी एक हिरो स्प्लेंडर प्लस अनेक महिन्यापासून देशातील बेस्ट सेलिंग बाईक ठरली आहे. ही बाईक खूप लोकप्रिय आहे. यामध्ये तुम्हाला पॉवरफुल इंजिनसह अनेक आधुनिक फीचर्स पाहायला मिळतात. तसे पाहता या बाईकची किंमत बाजारात जवळपास ८० हजार रुपये आहे. पण कमी बजेटमध्येही ही बाईक तुम्हाला घरी आणता येते.

अनेक ऑनलाइन वेबसाइट् हिरो स्प्लेंडर प्लस बाईकचे जुने मॉडेल अतिशय कमी किमतीत विकत आहेत. अशा परिस्थितीत, कमी बजेटमध्ये खरेदी करण्यासाठी तुम्ही काही ऑनलाइन वेबसाइटला एकदा भेट देऊ शकता. मात्र, या बातमीत आज आम्ही काही निवडक वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Cheapest Electric Scooter
६९ हजार रुपये किंमत, एका चार्जवर धावेल ११० किलोमीटर; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा यादी
finger in ice cream
मुंबईत आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचं? महत्त्वाची माहिती आली समोर
Hyundai Motor India IPO
LIC पेक्षाही मोठा IPO येतोय; ह्युंदाई मोटर इंडिया २५ हजार कोटी रुपये उभारणार
Best Selling Electric Scooter in May 2024
बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी, ३० दिवसात विकल्या ‘इतक्या’ स्कूटी
job opportunity
नोकरीची संधी: ‘बीएसएफ’मधील संधी
Apple upcoming iPhone 16 Pro and iPhone 16 Pro Max thinnest screen bezels ever seen on an iPhone breaking records
अल्ट्रा-थिन बेझल्स, डिस्प्ले अन् बरंच काही… लाँचपूर्वीच ॲपलच्या १६ सीरिजचे फीचर झाले लीक; पाहा डिटेल्स
Top 5 best-selling scooters in April 2024
‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ५ स्कूटर्स, शानदार फीचर्ससह देतात जबरदस्त मायलेज
Range Rover will be manufactured in the country
रेंज रोव्हरची देशात निर्मिती होणार!

Hero Splendor Plus बाईकचे जुने मॉडेल DROOM वेबसाइटवर विकले जात आहे. या बाईकच्या २०१४ मॉडेलची यादी येथे आहे. ही बाईक दिल्लीत नोंदणीकृत असून ती चांगल्या स्थितीत आहे. या बाईकची किंमत येथे २५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

(हे ही वाचा : डिझेल कारची बातच न्यारी! १० लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतायत ‘या’ पाच कार्स, मायलेजमध्ये आहेत बाप! )

हिरो स्प्लेंडर प्लस बाईकचे जुने मॉडेल BIKES4SALE वेबसाइटवर विकले जात आहे. या बाईकच्या २०१५ मॉडेलची यादी येथे आहे. ही बाईक हरियाणामध्ये नोंदणीकृत असून ती चांगल्या स्थितीत आहे. या बाईकची किंमत येथे ३०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Hero Splendor Plus बाईकचे जुने मॉडेल OLX वेबसाइटवर विकले जात आहे. या बाईकच्या २०१२ मॉडेलची यादी येथे आहे. ही बाईक दिल्लीत नोंदणीकृत असून ती चांगल्या स्थितीत आहे. या बाईकची किंमत येथे २०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.