Tata Ace EV: देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) ९ जानेवारी सोमवारी नवीन Ace EV ची (electric vehicle) डिलिव्हरी सुरू केली आहे. त्यामुळे शहरांतर्गत मालवाहतूक होण्यास मदत होईल. Ace EV हे भारतातील सर्वात प्रगत, 4-चाकी छोटे व्यावसायिक वाहन आहे.

Ace EV ची पहिली डिलिव्हरी ई-कॉमर्स, FMCG आणि कुरिअर कंपन्या आणि त्यांच्या लॉजिस्टिक सेवा प्रदाते Amazon, Delivery, DHL (एक्सप्रेस आणि सप्लाय चेन), FedEx, Flipkart, Johnson & Johnson Consumer Health, Moving, Safeexpress आणि ट्रेंट लिमिटेड लिमिटेड यांना डिलिव्‍हर करण्‍यात आला आहे.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

(हे ही वाचा : Mahindra च्या ‘या’ तीन कारने ग्राहकांना लावले वेड! झाली छप्परफाड विक्री )

Tata Ace EV पॉवर आणि रेंज 

Tata Ace EV हे टाटा मोटर्सचे EVOGEN इंजिन मिळवणारे पहिले उत्पादन आहे, जे १५४ किमीची प्रमाणित श्रेणी देते. नवीन मॉडेलमध्ये प्रगत बॅटरी कूलिंग सिस्टीम आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम आहे.

उच्च अपटाइमसाठी वाहन नियमित आणि जलद चार्जिंग दोन्ही प्रणालींना समर्थन देते. यात २७kW (36bhp) मोटर मिळते जी १३०Nm पीक टॉर्क जनरेट करते. Tata Ace EV मध्ये २०८ क्यूबिक फूट किंवा ३३३२.१६ kg/क्यूबिक मीटर कार्गो व्हॉल्यूम आणि २२ टक्के ग्रेड क्षमता असल्याचा दावा केला जातो जो पूर्णपणे लोड केल्यावर सहजपणे टेकड्यांवर चढू शकतो.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: प्रति किमी खर्च फक्त ८० पैसे, ४५ मिनिटांत चार्ज; अशी आहे, देशातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार )

Tata Ace EV किंमत

नवीन Ace EV चे अनावरण मे 2022 मध्ये करण्यात आले होते. त्रासमुक्त ई-कार्गो वाहतुकीसाठी Ace EV हा एक उत्तम पर्याय आहे. हे 5 वर्षांच्या देखभाल पॅकेजसह येते. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.60 लाख रुपयांपासून सुरू होते.