Car Protection in Summer: उन्हाळा सुरु आहे. पारा चढला म्हणून घराबाहेर न पडणे हा त्यावरील उपाय तर होऊ शकत नाही, तेव्हा या वाढत्या उन्हाचा, उकाड्याचा सामना प्रत्येकच लोक करत आहेत. तापमान वाढल्यामुळे अनेक जण वैतागले आहेत. त्यात आपण पाहिलं तर सध्या आपल्या वाहनाच्या देखील समस्या वाढत आहेत. म्हणूनच गाडी खरेदी करत असताना नेमक्या कोणत्या रंगाची गाडी खरेदी करावी की जी कमी प्रमाणात गरम होईल. बरेचदा उन्हाळ्यात गाडीचा रंग जात असतो, अचानक गाडी खूप गरम होत असते, गाडीचे टायर फाटत असतात. या समस्या का वाढत आहेत, सर्वप्रथम जाणून घेऊया.

उन्हाळ्यात गाडीचा रंग कमी होतो का?

देशात प्रदूषणाचे प्रमाण सध्या प्रचंड प्रमाणात वाढले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. याचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच वाहनांवर देखील होत आहे. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात असणारे तापमान यामुळे गाड्या जास्त गरम होऊन गाडीचा रंग कमी होतो, हवेतील उष्णतेचे प्रमाण तसेच तापमानात वाढ झाल्याने ही भीती अधिक जाणवते. तसेच जर का आपण उन्हामध्ये गाडी लावून ती स्वछ करत आहोत आणि अचानक गाडी स्वच्छ करताना वापरत असलेला कपडा खाली पडला आणि आपण तो तसाच वापरलात तर त्यामुळे देखील गाडीचा रंग कमी होतो.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Makeup tips for people with oily skin during summer
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप

(हे ही वाचा: Bajaj, TVS पाहतच राहिल्या, देशात सर्वाधिक खपली ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, हजारो ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी)

गाडीचे टायर का फाटतात?

आपण आपली गाडी जेव्हा जास्त ऊन असलेल्या ठिकाणी पार्क करतो त्यावेळी गाडीच्या टायरवर जास्त प्रमाणात दाब येतो. गाडीच्या टायरची हवा ही उन्हाळ्यात वेळेवर न तपासल्या कारणाने वाढत्या तापमानामुळे अचानक टायरवर दाब येऊन तयार फाटले जातात. वाहनांच्या काचांवर सनशेडचा वापर केल्यास वाहन गरम होत नाही. गाडीच्या काचांना सनशेड लावल्यास कारमधील प्लास्टिकचे संरक्षण होईल आणि ते वितळण्यापासून किंवा फुटण्यापासून वाचवता येईल.

गाडी घेत असताना कोणत्या रंगाची घ्यावी?

गाडी खरेदी करत असताना असे रंग निवडावे की जेणेकरून ते तीनही ऋतूंसाठी योग्य असतील. गाडी घेताना ती जास्त गडद रंगाची न घेता फिकट रंगाची घेणे गरजेचे आहे. काळ्या,लाल रंगाच्या गाड्या ह्या जास्त प्रमाणात उष्णता खेचून घेतात. परंतु पांढरा, राखाडी असे रंग घेतल्यास त्या उष्णतेपासून आपला बचाव करतात. जर आपली गाडी जास्त प्रमाणात उष्णता खेचून घेत असेल तर, गाडीवरील रंगाचे आवरण सुकते परिणामी गाड्यांचा रंग कमी होतो.