सध्या भारतीय बाजारपेठांमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या एसयूव्ही सेगमेंटमधील मॉडेल्स लॉन्च करत आहेत. एसयूव्ही सेगमेंट सध्या लोकांमध्ये लोकप्रिय सेगमेंट होताना दिसून येत आहे. तसेच लोकांची गरज पाहता कंपन्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सीएनजी कार देखील ऑफर करत आहेत. तुम्ही जर का सणासुदीच्या काळामध्ये सीएनजी कार घेण्याचा विचार करताय? तर आज आपण ह्युंदाई Exter आणि मारुती सुझुकी Fronx या दोन कॉम्पॅक्ट एसयूव्हीबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत आणि या मॉडेल्सची किंमत किती हे देखील पाहुयात.

Fronx Vs Exter: सेफ्टी फीचर्स

ह्युंदाई Exter मध्ये सर्व सीट्स या बेल्ट रिमाइंडरसह येतात. या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. तर मारुती Fronx च्या फक्त टॉप व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्स मिळतात. तसेच सीसीएनजी प्रकारात २ एअरबॅग्स उपलब्ध आहेत. Exter प्रमाणेच fronx मध्ये सर्व सीट्स या ३ पॉईंट सीट बेल्ट्स आणि ISOFIX सीट अँकरसह येतात. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

हेही वाचा : बाकी कंपन्यांची उडाली झोप, Jawa च्या दोन बाईक नव्या अवतारात देशात दाखल, पाहा किंमत

Fronx Vs Exter: रिअर पार्किंग कॅमेरा

ह्युंदाई Exter मध्ये रिअर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर हे फीचर्स वापरकर्त्यांना मिळतात. या फीचरमुळे कार पार्क करणे खूप सोपे होते. मारुती Fronx मध्ये अल्ट्रासॉनिक टेक्नॉलॉजीवर आधारित पार्किंग सेन्सर उपलब्ध आहेत. या सेन्सरच्या मदतीने कर पार्क करताना वाहन आणि वस्तूमधील यानंतर ओळखण्यास मदत होते.

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम

ह्युंदाई Exeter मध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम हे फिचर देखील मिळते. ही एसयूव्ही ह्युंदाईच्या सेगमेंटमधील पहिली कार आहे ज्यात हे फिचर देण्यात आले आहे. जर का गाडीतील टायरमधील परेश कमी झाले तर हे फिचर अलर्ट देते. हे सर्वात महत्वाचे फिचर आहे कारण टायर हे वाहनासाठी रस्त्यावरील एकमेव कॉन्टॅक्ट पॅच आहे. टायर प्रेशर आणि मेंटेनन्स कारच्या ब्रेकिंग सिस्टीमवर खूप परिणाम करते. तसेच कारची फ्यूएल क्षमता सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावते.

इन्फोटेनमेंट सिस्टीम

ह्युंदाई Exter मध्ये ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. जी स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी वायर्ड Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह व्हॉइस कमांड फंक्शनसह येतो. यामध्ये ६ स्पीकर जोडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मारुती Fronx मध्ये ७ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. ज्यात वायरलेस Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा सपोर्ट मिळतो. fronx चे सीएनजी व्हेरिएंट हे ४ स्पीकरसह येते. Exter आणि Fronx या दोन्हीच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये वायरलेस फोन चार्जरची सुविधा मिळत नाही.

हेही वाचा : Seltos-Nexon विसरुन मारुतीच्या ‘या’ कारवर संपूर्ण देश फिदा, २७ हजार लोकं रांगेत, वेटिंग पीरियड सात महिन्यांवर

Fronx Vs Exter: किंमत

ह्युंदाई Exter चे सीएनजी सेगमेंट बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये S CNG MT व्हेरिएंटची किंमत ८.२४ लाख आणि SX CNG MT व्हेरिएंटची किंमत ८.९७ लाख रुपये आहे. तर मारुती सुझुकी बलेनोवर आधारित असलेल्या fronx ला सीएनजी मॉडेलमध्ये देखील लॉन्च केले आहे. कंपनीने हे मॉडेल सीएनजीमध्ये दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. त्यातील सिग्मा आणि डेल्टा व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत ८.४२ लाख ते ९. २८ लाखांच्या मध्ये आहे. सीएनजी मॉडेलची किंमत पेट्रोल व्हेरिएंटपेक्षा ९५ हजार रुपये अधिक आहे.