MS Dhoni Made History CSK vs SRH match: आयपीएल २०२४च्या ४६व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादच्या रेकॉर्डब्रेक धावसंख्येचा दबदबा धुळीस मिळवला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने हैदराबादवर तब्बल ७८ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह एमएस धोनीने आयपीएलमध्ये इतिहास रचला. त्याने अशी कामगिरी आपल्या नावे केली आहे, जी आजवर कोणालाही जमली नाही.

एमएस धोनीचा आयपीएलमध्ये मोठा विक्रम

एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २५९ सामने खेळले आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडूचा विक्रम धोनीच्या नावे आहे. यापैकी १५० विजयी झालेल्या सामन्यांमध्ये धोनी संघाचा भाग होता. म्हणजेच तो आयपीएलच्या इतिहासात १५० सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत आतापर्यंत कोणताही खेळाडू एमएस धोनीपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

Rohit Sharma Becomes the First Batsman to hit 600 Sixes in International Cricket
T20 WC 2024: रोहित शर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज
Rohit Sharma breaks Dhoni's record
IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार
Ruben Trumplemann Creates Unique record in History of T20I
T20 WC 2024: नामिबियाच्या खेळाडूने रचला इतिहास, टी-२० मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
KKR won the trophy and became joint first with RR
KKR vs SRH : ट्रॉफी जिंकण्यासोबत केकेआरचा मोठा पराक्रम, IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदाच पाहायला मिळाला ‘हा’ विक्रम
Virat Kohli First Batsman to Complete 8000 Runs in IPL
विराट कोहलीने एलिमिनेटर सामन्यात रचला इतिहास, २९ धावा पूर्ण करताच ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
Virat Needs 29 runs to reach 8000 runs complete in IPL history
RR vs RCB : एलिमिनेटर सामन्यात विराट इतिहास रचण्यासाठी सज्ज! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिलाच खेळाडू
Bundesliga Football Championship Historic performance by undefeated Leverkusen sport news
बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धा: अपराजित लेव्हरकूसेनची ऐतिहासिक कामगिरी
Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 27 runs
IPL 2024 : RCB ने प्लेऑफ्ससाठी पात्र ठरून रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू
एमएस धोनी – १५० विजय
रोहित शर्मा – १३३ विजय
रवींद्र जडेजा – १३३ विजय
दिनेश कार्तिक – १३५ विजय
सुरेश रैना – १२२ विजय

एमएस धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३९.५३ च्या सरासरीने ५१७८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे. एमएस धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या मोसमात धोनीची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. धोनीचा स्ट्राईक रेट हा आयपीएल २०२४ मध्ये २५९.४६ इतका आहे, जो दुसरा सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे. याचसोबत धोनीने ९ पैकी ७ सामन्यांमध्ये फलंदाजी करत ९६ धावा केल्या आहेत, ज्यात एकदाही आऊट होऊन परतला नाही.