2023 upcoming Cars: नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नव्या वर्षात जर तुम्ही नवीन (New Car) कार घेण्याचा विचार करत असाल. तर आज आम्ही तुम्हाला १५ लाख रुपयांच्या आत येणाऱ्या जबरदस्त फीचर्सने भरलेल्या कारविषयी माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली कार निवडू शकता. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या कार.

या आहेत १५ लाख रुपयांच्या आतील कार

2WD Mahindra
2 व्हील ड्राइव्ह असलेली महिंद्रा थार लवकरच भारतीय बाजारात लाँच होऊ शकते. कंपनी या वाहनाची सुरुवातीची किंमत १० लाख रुपये ठेवू शकते, असा अंदाज आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच भारतीय बाजारपेठेत थारची अधिक परवडणारी आवृत्ती लाँच करणार आहे.

Mahindra Thar 5-door
महिंद्रा थार ही भारताली एक किफायतशीर ऑफ रोडर एसयूव्ही कार आहे. या कारचं ५ डोर व्हर्जन लाँच करणार आहे. 5 दरवाजे असलेली महिंद्रा थार २०२३ मध्ये लाँच होऊ शकते. या वाहनाची सुरुवातीची किंमत सुमारे १५ लाख रुपये असू शकते.

(हे ही वाचा : सर्वात महागडी ‘ही’ Royal Enfield बुलेट आता ५० ते ७० हजारांत; पाहा कुठे मिळतेय ही बेस्ट डील )

Force Gurkha 5 door
फोर्स मोटर्स कंपनी भारतीय बाजारात लवकरच आपली गुरखा एसयूव्ही कार लाँच करणार आहे. या एसयूव्हीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही १३ सीटर कार असेल. Force Gurkha 5 door या वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकतो, ज्याची संभाव्य किंमत सुमारे १५ लाख रुपये सुरू होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Maruti Jimny 5 door
जिम्नी ही ५ डोर कार आहे. ही कार खास भारतीय बाजारपेठेसाठी तयार करण्यात आली आहे. ही एक आकर्षक ऑफ रोडर छोटी एसयूव्ही आहे. महिंद्राची वाहने भारतात सर्वाधिक खरेदी केली जातात, त्याचा बाजारातील हिस्सा आणखी मजबूत करण्यासाठी मारुती जिमनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आणली जाऊ शकते. हे वाहन लाँच होताच थार आणि गुरखा यांना टक्कर देईल. त्याची संभाव्य किंमत १०-१२ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.