scorecardresearch

२८ फेब्रुवारीपर्यंत टाटा Tiago, Safari, Altroz सह या 5 Cars वर बंपर ऑफर्स; बुकिंग करून वाचवा हजारो रुपये

Tata Motors Huge Discount: टाटा कंपनीच्या कार या मध्यमवर्गीयांना सुद्धा स्टायलिश थाट अनुभवण्याची संधी देतात. फेब्रुवारी स्पेशल ही ऑफर टाटाचं Valentine गिफ्ट म्हणता येईल.

Golden Chance Tata Motors Huge Discount Tiago Tigor Altroz Harrier Safari Save Thousands Of Rupees Last Date 28th Feb
२८ फेब्रुवारीपर्यंत टाटा Tiago, Safari, Altroz सह या 5 Cars वर बंपर ऑफर्स (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Tata Motors Huge Discount: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात कित्येक वर्षांपासून मानाचे स्थान मिळवलेल्या टाटा मोटर्सतर्फे ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर जाहीर करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने फेब्रुवारी महिन्यासाठी खास ऑफर आणली आहे. ज्याअंतर्गत, Tata Tiago, Tata Tigor, Tata Altroz, Tata Harrier व Tata Safari या गाड्या खरेदी करताना ग्राहकांना बचत करता येऊ शकते. २८ फेब्रुवारीपर्यंत ही ऑफर लागू असेल. टाटा कंपनीच्या कार या मध्यमवर्गीयांना सुद्धा स्टायलिश थाट अनुभवण्याची संधी देतात, एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबात गाडी खरेदी करताना पै- पै जमा केली जाते अशात कंपनीकडून मिळालेले हजारो रुपयांचे डिस्काउंट नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

प्राप्त माहितीनुसार, टाटाच्या वाहनांच्या खरेदीवर खरेदीदारांना ३५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.लक्षात ठेवा की ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२३ पूर्वी केलेल्या खरेदीवर उपलब्ध आहे. ही सूट देशभरातील टाटा मोटर डीलरशिपवर उपलब्ध आहे. ज्या टाटा कारवर ही ऑफर आहे त्यांची खासियत जाणून घेऊयात..

टाटा टियागो (TATA Tiago Price)

Tata Motors ने Tata Tiago वर २०,००० रुपयांची ऑफर जाहीर केली आहे. ही सवलत हॅचबॅकच्या पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर उपलब्ध आहे. ऑफरमध्ये १०,००० रुपये एक्सचेंज बोनस व १०,००० सूट असे स्वरूप ठेवण्यात आले आहे.

टाटा हॅरियर (TATA Harrier Price)

Tata Harrier वर फेब्रुवारी महिन्यात ३५,००० चे मोठे डिस्काउंट मिळवता येणार आहे. यापैकी २५,००० रुपये एक्सचेंज सूट आणि १०,००० पर्यंतचे कंपनी डिस्काउंट समाविष्ट आहे.

टाटा सफारी (TATA Safari Price)

टाटा सफारी या ६-सीटर SUV वर ३५,००० चे मोठे डिस्काउंट मिळवता येणार आहे. कंपनी SUV च्या सर्व प्रकारांवर सूट देत आहे. यापैकी २५,००० रुपये एक्सचेंज सूट आणि १०,००० पर्यंतचे कंपनी डिस्काउंट समाविष्ट आहे.

टाटा टिगोर (TATA Tigor Price)

ऑटोमेकरने टिगोर कॉम्पॅक्ट सेडानवर २५,००० पर्यंत ऑफर जाहीर केल्या आहेत. खरेदीदार CNG आवृत्तीवर १०,००० ची एक्सचेंज सूट घेऊ शकतात तर १५,००० कंपनी डिस्काउंट आहे. दुसरीकडे, पेट्रोल व्हेरिएंटची कार १०,००० कंपनी डिस्काउंट व १०,००० एक्सचेंज ऑफरच्या रूपात २०,००० रुपये कमी किमतीत घेतले जाऊ शकते.

हे ही वाचा<< TaTa Motors च्या ‘या’ दोन लोकप्रिय SUV वर लाखोंची सूट, पाहा टाटाची जबरदस्त ऑफर 

टाटा अल्ट्रोझ (TATA Altroz Price)

टाटा अल्ट्रोजच्या ​​डिझेल गाडीवर २५,००० ची सूट आणि पेट्रोल मॉडेलवर २०,००० ची सूट मिळणार आहे. ऑफरमध्ये १०,००० ची एक्सचेंज सूट घेऊ शकतात तर १५,००० कंपनी डिस्काउंट आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 17:54 IST