scorecardresearch

Hero Maestro Edge 110 Vs Honda Dio: किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोणती स्कूटर बेस्ट, जाणून घ्या

देशातील टू व्हीलर सेक्टरमध्ये स्पोर्टी डिझाईन्स आणि हाय-टेक फीचर्स असलेल्या मायलेज स्कूटर्सची मोठी रेंज आहे.

Hero-Vs-Honda-20
Hero Maestro Edge 110 Vs Honda Dio: किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोणती स्कूटर बेस्ट, जाणून घ्या (फोटो- HERO, HONDA)

देशातील टू व्हीलर सेक्टरमध्ये स्पोर्टी डिझाईन्स आणि हाय-टेक फीचर्स असलेल्या मायलेज स्कूटर्सची मोठी रेंज आहे. यात १०० सीसी ते १५० सीसी स्कूटरचा समावेश आहे. जर तुम्हाला स्पोर्टी डिझाइनसह मायलेज देणारी स्कूटर खरेदी करायची असेल तर देशातील दोन लोकप्रिय स्कूटरची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या तुलनेत आज आमच्याकडे Hero Maestro Edge 110 आणि Honda Dio स्कूटर आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या दोघांच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

Hero Maestro Edge 110: हिरो Maestro Edge 110 ही एक स्टायलिश स्कूटर आहे. कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरच्या यादीत येते. कंपनीने तीन प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात ११०.९ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.१५ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही हिरो Maestro Edge 110 स्कूटर ५१ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. हिरो Maestro Edge 110 ची सुरुवातीची किंमत ६५,९०० रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर ६८,५०० रुपयांपर्यंत जाते.

TVS, Yamaha आणि KTM ची स्पोर्ट्स बाइक स्वस्तात हवी आहे? इथे मिळणार EMI पर्यायासह सहा महिन्यांची वॉरंटी

Honda Dio: होंडा Dio ही एक स्पोर्टी डिझाइन स्कूटर आहे. कंपनीने दोन प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने १०९.५१ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे, जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ७.७६ पीएस पॉवर आणि ९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही होंडा ५९.५ किमीचा मायलेज देत असून ARAI ने प्रमाणित केले आहे. होंडा Dio स्कूटरची सुरुवातीची किंमत ६५,०७५ रुपये असून टॉप व्हेरिएंटवर ६८,४७३ रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2022 at 12:43 IST