दुचाकीमध्ये स्कूटर्सना सर्वाधिक मागणी आहे. कारण हलक्या वजनासह लांब मायलेज देतात. तुम्हालाही हलक्या वजनासह लांब मायलेज देणारी नवीन स्कूटर खरेदी करायची असेल, तर अशा दोन लोकप्रिय स्कूटरची संपूर्ण माहिती येथे जाणून घेता येईल. या तुलनेसाठी, आमच्याकडे Hero Pleasure Plus आणि TVS Scooty Zest या दोन गाड्या आहेत. या दोन्ही गाड्यांच्या किमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंतच्या संपूर्ण तपशील दिला आहे.

Hero Pleasure Plus: हिरो प्लेजर प्लस ही कंपनीची लोकप्रिय स्कूटर आहे. या स्कूटरची मागणी पाहता कंपनीने Xtec अवतारसह बाजारात नवं मॉडेल लाँच केले आहे. स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडर ११०.९ सीसी इंजिन असून ८.१ पीएस कमाल पॉवर आणि ८.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. तसेच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबद्दल, हिरोचा दावा आहे की, ही स्कूटर ६३ किमीचा मायलेज देते आमि ARAI ने प्रमाणित केले आहे. या हिरो प्लेजर प्लसची सुरुवातीची किंमत ६२,२२० रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर जाताना ७१,४२० रुपयांपर्यंत जाते.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
When Maths Lover Or mathematician Start Selling Fruits You Will Laugh After Seeing This Mangoes Price
आंब्यांचे गणित! विक्रेत्याची स्टाईल पाहून व्हाल अवाक्; PHOTO पाहून वही-पेन घ्याल हातात
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…

इलेक्ट्रीक वाहनांची विक्री तेजीत असताना मारुतीच्या प्रमुखांचं चिंतेत टाकणारं वक्तव्य, म्हणाले “पुढच्या १० ते १५ वर्षात…”

TVS Scooty Zest: टीव्हीएस स्कुटी जेस्ट ही त्यांच्या कंपनीची लाइट वेट मायलेज देणारी स्कूटर आहे. ही स्कूटर दोन प्रकारांसह बाजारात लाँच करण्यात आली आहे. टीव्हीएसने या स्कूटरमध्ये १०९.७ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. ७.८१ पीएस पॉवर आणि ८.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये, कंपनीने पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये अॅलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्ससह ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे. स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही स्कूटी जेस्ट ६२ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि त्याला ARAI ने प्रमाणित केले आहे. या गाडीची किंमत ५७,६९४ रुपये असून टॉप व्हेरियंटवर ७२,१७० रुपयांपर्यंत जाते.