सध्या ऑटो मार्केटमध्ये  एसयूव्ही कार्सना मोठी मागणी आहे. अलिकडेच कोरियन कार उत्पादक कंपनी Hyundai ने आपली सर्वात छोटी एसयूव्ही रस्त्यावर आणली आहे. कंपनीने आपली नवीन एसयूव्ही एक्स्टर (SUV Exter) देशात दाखल केली आहे.  Exeter SUV ही कार टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रँक्सला टक्कर देते.

Hyundai Motor India ने बुधवारी माहिती दिली की, त्यांच्या नवीनतम SUV Exter ला लाँच झाल्यापासून एका महिन्यात ५०,००० पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. तीस दिवसाच्या कमी कालावधीत हे पूर्ण केले असल्याचे कंपनीने सांगितले.

Viral Video
Viral Video : पोलिस अधिकाऱ्याने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी घायाळ, व्हायरल होतोय व्हिडीओ
Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

Hyundai Exter फीचर्स

स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आगामी कारमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV आहे. कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हीकल स्टॅबलिटी मॅनेजमेंट, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखी इतर फीचर्स देखील कारमध्ये मिळाले आहेत.

(हे ही वाचा: ५.९९ लाखाच्या कारवर अख्खा देश फिदा; बाकी सर्व पडल्या फिक्या, ३० दिवसात विकल्या १७,८९६ गाड्या, मायलेज ३०.९० किमी )

Hyundai Xtor ला १.२ लीटर काप्पा पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने कारच्या सीएनजी व्हर्जनमध्येही हेच इंजिन दिले आहे. हे इंजिन ८१.८६ bhp पॉवर आणि ११३.८ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सीएनजी व्हर्जनमध्ये या कारचे इंजिन ६८ बीएचपी पॉवर आणि ९५.२ एनएम टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल ट्रान्समिशनसह एक्स्टर एक लिटर पेट्रोल वापरून १९.४ किलोमीटर अंतर कापेल, असा कंपनीचा दावा आहे. AMT गिअरबॉक्ससह ट्रिम पेट्रोलवर १९.२ किलोमीटर प्रति लिटर मायलेज परत करण्यास सक्षम असेल. दुसरीकडे, ही CNG आवृत्ती कार एक किलो CNG वापरून २७.१ किमी मायलेज देईल. Hyundai ची सर्वात स्वस्त कार देखील E20 इंधनावर धावेल. E20 इंधन असे आहे ज्यामध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल असते.

किंमत

Hyundai च्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ५.९९ लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत ९.३१ लाख रुपये आहे. कंपनीने ही कार एकूण ७ ट्रिममध्ये सादर केली आहे. ही कार Hyundai ची सर्वात परवडणारी SUV असेल. ही कार तुम्ही ११,००० रुपये टोकन रक्कम भरून ती बुक करु शकता.