दक्षिण कोरियन कंपनी Hyundai च्या कारला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मारुती, टाटानंतर देशातील बाजारात Hyundai च्या कारला ग्राहकांची मोठी पसंती मिळत असते. म्हणून कंपनी बाजारपेठेत नवनव्या कार लाँच करत असते.

Hyundai ने त्यांच्या सब-4 मीटर SUV व्हेन्यूचा एक नवीन ‘Hyundai Venue Executive Turbo MT’ प्रकार लाँच केला आहे, त्याची किंमत १० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हा प्रकार फक्त १.०-लिटर ३-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. नवीन Hyundai Venue Executive Turbo मध्ये १६-इंच ड्युअल-टोन व्हील आहेत.

share market today
शेअर बाजाराने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक; सेन्सेक्स ७७ हजार पार, निफ्टीतही तेजी
Best Selling SUV Car
बाजारात ७.४६ लाखाच्या ‘या’ ५ सीटर SUV ला तुफान मागणी, १४ महिन्यांत १.५ लाखाहून अधिक कारची विक्री, मायलेज…
Tata Punch facelift 2024
टाटाचा नाद करायचा नाय! देशात नव्या अवतारात आणतेय ‘ही’ सर्वात सुरक्षित कार; मायलेज २६ किमी अन् किंमतही कमी
India's Aamras ranks first in the world's Best-Rated Dishes With Mango
आमरस ठरला जगात अव्वल! गोड-रसाळ आंब्यापासून बनवलेला जगातील सर्वोत्तम पदार्थ, आंब्याच्या चटणीनेही मिळवले यादीत स्थान
stock market update sensex jump by 149 points to settle at 76606 print
Stock Market Update : ‘निफ्टी’ची उच्चांकी पातळीला गवसणी
Beneficiary of changing economic momentum Tata Banking and Financial Services Fund
बदलत्या अर्थगतीचा लाभार्थी: टाटा बँकिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड
Top 5 best-selling scooters in April 2024
‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ५ स्कूटर्स, शानदार फीचर्ससह देतात जबरदस्त मायलेज
stock market update sensex jumped 1200 points to close at 75418
भांडवली बाजाराचा विक्रमी सूर; सेन्सेक्स १,२०० अंशांच्या उसळीने ७५,४१८ पातळीवर

त्याच्या नवीन Executive प्रकारात वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले आणि व्हॉईस रेकग्निशन सपोर्टसह ८-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यात कलर टीएफटी एमआयडी, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स आणि मागील वायपरसह डिजिटल क्लस्टर देखील आहे.

(हे ही वाचा : Dzire, Aura अन् Tigor ला फुटला घाम, नव्या रुपात येतेय होंडाची स्वस्त सेडान कार, पाहा कोणते होणार महत्त्वपूर्ण बदल)

सुरक्षेसाठी, Hyundai Venue Executive Turbo प्रकारात ६ एअरबॅग्ज, सर्व सीटसाठी सीट बेल्ट रिमाइंडरसह ३-पॉइंट सीट बेल्ट, ESC, VSM, हिल असिस्ट कंट्रोल, IRVM, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहे. त्याचे १.०-लिटर ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन १२०PS पॉवर आणि १७२Nm टॉर्क जनरेट करते. यात आयडल स्टॉप अँड गो (ISG) वैशिष्ट्य देखील आहे. इंजिन पॉवर ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सद्वारे पुढच्या चाकांवर जाते.

Hyundai ने Venue S (O) Turbo प्रकारात नवीन वैशिष्ट्ये देखील समाविष्ट केली आहेत. आता यात ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी इलेक्ट्रिक सनरूफ आणि मॅप लॅम्पही देण्यात आले आहेत. यात १.०L T-GDI इंजिन आहे, जे ६-स्पीड मॅन्युअल आणि ७DCT ट्रान्समिशन पर्यायासह दिले जाते. मॅन्युअल व्हर्जनची किंमत १०.७५ लाख रुपये आहे आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत ११.८६ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.