भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत चालली आहे. पुढील १० वर्षात भारतीय रस्त्यांवर पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. इलेक्ट्रिक कार्सच्या यादीत टाटा मोटर्स आघाडीवर आहे. टाटा मोटर्सकडे नेक्सॉन, टिगोर आणि टियागो सारख्या अनेक इलेक्ट्रिक कार आहेत आणि या कार्सना भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. त्यातच महिंद्राच्याही इलेक्ट्रिक कार खूप पसंत केल्या जातात. परंतु भारतीय बाजारात अशी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, ज्या कारची विक्री खूपच कमी झाली आहे आणि ही कंपनीची सर्वात कमी विक्री होणारी कार ठरली आहे.

Hyundai च्या एका इलेक्ट्रिक एसयूव्हीची मागणी बाजारात फार कमी असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये विक्रीच्या बाबतीत, या कारनं १०० चा आकडाही गाठलेला नाहीये. Hyundai electric SUV च्या विक्रीत घट झाली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये एकूण १०६ युनिट्सची विक्री झाली, त्या तुलनेत ऑक्टोबर २०२३ मध्ये, विक्री वार्षिक आधारावर ६८ टक्क्यांनी घटून केवळ ४४ युनिट्सवर आली. म्हणजेच एका दिवसात सरासरी २ कारही विकल्या जाऊ शकल्या नाहीत. Hyundai च्या पोर्टफोलिओमध्ये ही सर्वात कमी विकली जाणारी कार ठरली आहे.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

ह्युंदाईच्या ‘या’ इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या विक्रीत घट

आता भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे आणि त्यात टाटा नेक्सॉन ईव्ही आघाडीवर आहे. तर दुसरीकडे Hyundai कडे Hyundai Kona Electric SUV देखील आहे पण, Hyundai Kona इलेक्ट्रिक SUV ची विक्री फारशी होत नाहीये. या कारच्या विक्रीत घट झाली आहे.

(हे ही वाचा : सणासुदीत Bajaj, Honda, TVS च्या टू-व्हीलर पडल्या फिक्या! ‘या’ कंपनीची बाईक घेण्यासाठी शोरूम्समध्ये उसळली गर्दी )

Electric SUV मध्ये काय आहे खास

भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक कोनात ३९.२ kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळते. याचे इलेक्ट्रिक मोटर १३६ps ची पॉवर आणि ३९५ Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ४५२ किलोमीटर पर्यंत ही कार धावू शकेल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ९.७ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटर प्रति तास वेग पकडण्यात सक्षम आहे.

कोना इलेक्ट्रिक मध्ये सहा-एयरबॅग्स, ईबीडी सोबत एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, गाइड लाइन्स सोबत रियर कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ७.० इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, ७.० इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, वायरलेस फोन चार्जिंग, सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, रिअर एसी व्हेंट आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

किंमत

Hyundai Kona ची किंमत २३.८४ लाख रुपये ते २४.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.