Hyundai कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. नुकतीच कंपनीने आपले मायक्रो एसयूव्ही Exter लॉन्च केली आहे. तसेच ह्युंदाईच्या सेगमेंटमध्ये क्रेटा ही सर्वात जास्त लोकप्रिय एसयूव्ही आहे. तसेच कंपनीने Alcazar ही आपली मिड साइझ एसयूव्ही देखील लॉन्च केली होती. ह्युंदाई मोटर इंडियाने क्रेटा आणि Alcazar मिड साइझ एसयूव्हीचे अ‍ॅडव्हेंचर एडिशन मॉडेल लॉन्च केले आहे. नवीन ह्युंदाई क्रेटा अ‍ॅडव्हेंचर एडिशनची किंमत १५.१७ लाखांपासून सुरू होते. तर Alcazar ची किंमत १९.०४ लाखांपासून सुरू होते. या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांना कॉस्मेटिक अपडेट्स आणि काही नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक व्हेरिएंटची किंमत देखील आपण जाणून घेऊयात.

नवीन अ‍ॅडव्हेंचर एडिशनमध्ये काय आहे नवीन?

ह्युंदाई क्रेटा आणि Alcazar च्या अ‍ॅडव्हेंचर एडिशनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ब्लॅक आऊट ग्रील आणि बंपरसाठी दोरक ट्रीटमेंट, स्किड प्लेट आणि अलॉय व्हील्सचा समावेश आहे. नवीन रेंजर खाकी शेडसह अनेक मोनो-टोन आणि ड्युअल-टोन रंगसंगती यामध्ये उपलब्ध आहेत. नवीन कारच्या इंटेरिअरमध्ये सेज ग्रीन इन्सर्टसह ब्लॅक केबिन आणि ड्युअल कॅमेरासह डॅशकॅम सारखी अनेक लेटेस्ट फीचर्स जोडण्यात आले आहेत.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या

हेही वाचा : 2024 Kawasaki Ninja 650: स्पोर्ट्स सेगमेंटमध्ये लॉन्च झाली कावासाकी निंजा ६५०, किंमतीसह जाणून घ्या नवीन फीचर्स

इंजिन आणि गिअरबॉक्स

ह्युंदाई क्रेटा अ‍ॅडव्हेंचर एडिशनमध्ये १.५ लिटरचे नैसर्गिक अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. जे ११३ बीएचपी आणि १४४ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि IVT (CVT) सह जोडलेले आहे. तर ह्युंदाई Alcazar मध्ये १५८ बीएचपीचे १.५ लिटरचे टर्बो पेट्रोल मोटर आणि ११३ बीएचपीचे १.५ लिटरचे डिझेल इंजिन मिळते. दोन्ही इंजिन्स मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह ऑफर केले जातात.

ह्युंदाई क्रेटा या SUV मध्ये २.० लिटर ४ सिलेंडरचे एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे १५७ बीएचपी आणि १८८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याचे फ्लेक्स फ्युएल सिरीज १६७ बीएचपी पॉवर आणि २०२ एनएम टॉर्क जनरेट करते.यामध्ये तुम्हाला ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळणार आहे. नवीन Hyundai Creta N Line Night Edition ला Advanced Driver Assistance System (ADAS) हे फिचर मिळते. अडॅप्टिव्ह ऑटोपायलट, लेन असिस्टन्स आणि ऑटो ब्रेकिंग सारखे फीचर्स अनेक फीचर्स ADAS मध्ये उपलब्ध आहेत.