नवीन कार खरेदी करताना महत्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. खास करुन ग्राहक गाडीच्या रंगाकडे विशेष लक्ष देतात. काही जण काळ्या रंगाच्या कारला अधिक पसंती देतात. पण नुकतेच World of Statistics ने आपल्या अहवालात काळ्या रंगाच्या गाड्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते, असा दावा केला आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या या अहवालानुसार, काळ्या रंगाच्या गाडीला ४७ टक्के अपघाताचा धोका आहे. त्यानंतर राखाडी रंगाच्या गाड्यांना ११ टक्के चंदेरी रंगाच्या गाड्यांना १० टक्के आणि निळ्या आणि लाल रंगाच्या गाड्यांना ७ टक्के अपघाताचा धोका असतो. त्याच्या तुलनेत या अहवालात पांढऱ्या रंगाला सर्वात वरचं स्थान देण्यात आलं आहे. या रंगाच्या कारला अपघाताचा धोका कमी असतो, असे म्हटले आहे.  पिवळे, केशरी आणि सोनेरी रंगाच्या गाड्यांनाही अपघाताचा धोका कमी असतो, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 

आणखी वाचा : पावसात प्रवास करण्यापूर्वी बाईकमधील ‘या’ गोष्टी तपासा, सुखद आणि सुरक्षित होईल प्रवास

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या अहवालाची खिल्ली उडवली आहे. आनंद महिंद्र यांनी अहवालातील ही माहिती निव्वळ खोटी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या अहवालाच्या ट्विटर पेजवर याबाबत माहिती दिली आहे.  आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर नेटीझन्सनीही भरघोस प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी महिंद्रा यांच्या प्रतिक्रियेला समर्थन दिले आहे. या अहवालाला कोणताही वैज्ञानिक दृष्टीकोन नाही, अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटीझन्सनी आनंद महिंद्रा यांच्या ट्विटरवर दिल्या आहेत.