बाईक रेस मधली सर्वात लोकप्रिय बाईक रेस म्हणजे मोटो जीपी ज्याची झलक आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळणार आहे. या कारणामुळे दुचाकी कंपनी त्यांच्या मोटो जीपी बाईक सतत लाँच करत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक निर्माती कंपनी केटीएमने आपल्या दोन बाईक्सची मोटो जीपी एडिशन लाँच केले आहेत. या सुपर स्पोर्ट्स बाईक मध्ये RC 390 आणि RC 200 यांचा समावेश आहे. जाणून घेऊया या बाईक्सची खास वैशिष्ट्ये.

इंजिन

KTM RC 200 ला १९९ सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन २५.४ एचपीची कमाल पॉवर आणि १९.५ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. तर केटीएम आरसी ३९० मध्ये ३७३ सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन ४३ hp चा जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि ३७ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. दोन्ही बाईकमध्ये ६-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स आहे.

आणखी वाचा : ‘या’ दोन हिरो मोटरसायकल अतिशय कमी किंमतीत उपलब्ध; खरेदी करण्याची संधी, कोणती असेल सर्वोत्तम जाणून घ्या!

लुक

केटीएमच्या या दोन्ही बाईक सिग्नेचर ऑरेंज रंगामध्ये आहेत. तसेच, त्यावरील काळ्या रंगाचे स्टिकर्स बाइकला आणखीन आकर्षक बनवत आहे. बाकी गोष्टींमध्ये या बाईक सारख्या आहेत.

किंमत

केटीएमच्या नवीन RC 390 GP एडिशनची एक्स-शोरूम किंमत ३,१६,०७० रुपये आहे. तर RC 200 GP एडिशनची एक्स-शोरूम किंमत २,१४,६८८ रुपये आहे. या दोन्ही बाइक्सचा लुक अतिशय आकर्षक असून बाइक्स प्रेमींना या अधिक आकर्षित करतील.