भारतातील लोकांचे गाड्या खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजकाल प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला एक तरी फोर व्हालीर बघायला मिळतेच. सध्या देशातील लोकांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वात जास्त प्रवासी वाहनांची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या बद्दल अधिक जाणून घेऊयात.

भारतीय ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये सुमारे २.९२ लाख प्रवासी वाहनांची घाऊक विक्री केली आहे. फेब्रुवारी महिन्यातील आतापर्यंतची ही सर्वाधिक विक्री आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने ही माहिती दिली आहे. कार आणि युटिलिटी वाहनांच्या वाढत्या मागणीमुळेच एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे SIAM ने म्हटले आहे. गेल्या महिन्यामध्ये वाहन कंपन्यांनी २,९१,९२८ इतकी वाहने डिलर्सकडे पाठवली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये विक्री झालेल्या २,६२,९८४ वाहनांपेक्षा फेब्रुवारी २०२३ मध्ये ही आकडेवारी ११ टक्क्यांनी वाढली आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

हेही वाचा : Hyundai Creta नव्या अवतारात दाखल, कंपनी केवळ ‘इतक्याच’ गाड्या विकणार, किंमत…

तसेच फेब्रुवारी महिन्यातील प्रवासी कारची विक्री ही १,४२,२०१ युनिट्सनी वाढली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीमध्ये १,३३,५७२ वाहनांची विक्री झाली होती. स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांसह (SUV) युटिलिटी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात १,२०,१२२ युनिट्सवरून १,३८,२३८ युनिट्सपर्यंत वाढली आहे.

maruti Suzuki India ने गेल्या महिन्यात १,०२,५६५ वाहने आपल्या डीलर्सना पाठवली आहेत. ही संख्या फेब्रुवारी २०२२ च्या वाहनांपेक्षा ३ टक्के अधिक आहे. तर Hyundai Motor India ने गेल्या महिन्यात २४,४९३ वाहनांची विक्री केली तर फेब्रुवारी २०२२ मध्ये ही संख्या २१,५०१ इतकी होती.