scorecardresearch

विना ड्रायव्हर चालणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा पुढाकार; सिंगल चार्जवर कापणार ३०० किमी अंतर!

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ऑटोमोटिव डिझाइन पिनिनफरिना कंपनीने एक इलेक्ट्रिक ट्रक तयार केला आहे.

Electric_Truck
विना ड्रायव्हर चालणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा पुढाकार; सिंगल चार्जवर कापणार ३०० किमी अंतर! (Photo- Twitter)

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ऑटोमोटिव डिझाइन पिनिनफेरिना कंपनीने एक इलेक्ट्रिक ट्रक तयार केला आहे. हा कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक ट्रक बुलेट ट्रेन सारखा दिसतो. या ट्रकची रचना खूपच आकर्षक आहे. कंपनीने Baidu ची सब्सिडिअरी DeepWay कंपनीसोबत डिझाइन केलं आहे. पिनिनफेरिना एक इटालियन ऑटोमोटिव डिझाइन कंपनी असून त्यावर महिंद्रा समूहाचा मालकी हक्क आहे. हा ट्रक एका चार्जवर ३०० किमीपर्यंतचे अंतर कापू शकतो. तसेच सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नोलॉजीसह येईल. म्हणजेच ड्रायव्हरशिवाय रस्त्यावर धावेल.

पिनिनफेरिनाने डिझाइन केलेला ट्रकमध्ये ४५ किलोवॅट बॅटरी पॅक आहे. एका चार्जवर ३०० किमीपर्यंत जाण्याची शक्ती मिळते. एवढेच नाही तर एकावेळी ४९ टन वजनाने एवढे अंतर पार करू शकतो. अलीकडे, महिंद्रा समूहाने कार व्यतिरिक्त बाइक्स, सुपरकार्स आणि इतर प्रकारच्या ऑटोमोटिव्ह विभागांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. हा पिनिनफेरिना ट्रक त्या दिशेने एक पाऊल आहे.

कंपनीने या ट्रकला ११ ऑन-बोर्ड वाइड अँगल कॅमेरे, इन्फ्रारेड डिटेक्टर, रडार आणि LIDAR सेन्सर्सने सुसज्ज केले आहे. यामुळे ट्रक चालकाशिवाय धावू शकतो, कारण या सर्व गोष्टींमुळे ट्रक ऑटोमेटिक चालण्यास सक्षम होतो. याशिवाय याच्या केबिनमध्ये अनेक प्रीमियम आणि हाय-टेक फीचर्सचा वापर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahindra group pininfarina design concept electric truck with self driving technology rmt

ताज्या बातम्या