मारुती सुझुकी येत्या काही दिवसात पाच नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, यामध्ये कोणतीही नवीन कार लॉन्च केली जाणार नाही. सध्याच्या कारचे अपडेट व्हेरियंट लॉन्च केले जाणार आहेत. यामध्ये मारुती विटारा ब्रेझा, बलेनो, अल्टो, मारुती एस-क्रॉस आणि जिम्नी एसयूव्हीचा समावेश आहे. मारुती या कारमध्ये कोणते नवीन फीचर्स देणार आणि ही कार कधी लॉन्च होणार आहे ते जाणून घेऊयात.

  • मारुती विटारा ब्रेझा – नवीन ब्रेझामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. रिफाइन फ्रंट फेशियल, नवीन फेंडर आणि बोनेटवर काम केलं आहे. कारचे हेडलॅम्प आणि ग्रील एकत्र करून एकच युनिट म्हणून दिले आहेत. समोरचा बंपर काळ्या रंगात इंटिग्रेटेड आहे. मागील बाजूस, रॅपराऊंड टेल-लॅम्प टेलगेटपर्यंत वाढविण्यात आले आहेत. टेलगेट देखील बदलले आहेत. गाडीची नंबर प्लेट दिव्यांच्या खाली लावलेली आहे. मागील बंपर देखील नवीन देण्यात आला आहे. दुसरीकडे, इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यात फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन युनिट, एक नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. नेक्स्ट जनरेशन ब्रेझामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. जे १०३ बीएचपी पॉवर आणि १३८ एनएम कमाल टॉर्क जनरेट करेल.
  • मारुती बलेनो फेसलिफ्ट – मारुती सुझुकी लवकरच नवीन बलेनो लॉन्च करणार आहे. ही मारुतीची लोकप्रिय हॅचबॅक कार आहे, ज्यामध्ये कंपनी नवीन फ्रंट ग्रिल, एलईडी डीआरएल हेडलाइट्स देऊ शकते. यासोबतच कंपनीने बलेनो हॅचबॅक कारमध्ये इंटीरियर आणि एक्सटीरियरमध्ये बरेच बदल केले आहेत. नवीन बलेनोमध्ये तुम्हाला १.२ लीटर पेट्रोल इंजिन मिळेल जे ८२ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन बलेनोला ५-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन असेल.
  • मारुती सुझुकी अल्टो – नवीन अल्टोला ब्लॅक-आउट स्टील रिम व्हील आणि साइड फ्रंट फेंडर टर्न इंडिकेटर देण्याची शक्यता आहे. यासह हायलाइट्स, नवीन बंपर आणि हेडलॅम्पसह विस्तीर्ण फ्रंट ग्रिल दिले जाऊ शकतात. त्याचबरोबर मारुती सुझुकीने अल्टोच्या केबिनची जागा वाढवण्यासाठी आतील भागातही बदल केले आहेत. दुसरीकडे, या हॅचबॅक कारमधील इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, ७९६ सीसी तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. जे ४७ बीएचपी पॉवर आणि ६९ एनएम टॉर्क जनरेट करते.

Maruti Suzuki: तुमच्या कारमध्ये काही समस्या असेल तर लगेच संपर्क साधा; ‘या’ गाड्यांसाठी विशेष सर्व्हिस मोहीम

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
  • मारुती सुझुकी एस-क्रॉस – या गाडीचं अद्ययावत मॉडेल कंपनीने युरोपियन बाजारपेठेत लॉन्च केलं आहे. ज्यामध्ये ALLGRIP SELECT सह अनेक फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत. कंपनीने युरोपमध्ये एस-क्रॉस मॉडेल सादर केले आहे, त्यात युरोपियन मानकांनुसार ४८व्होल्ट SHVS माइल्ड हायब्रिड प्रणाली ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे दुसरीकडे, सर्व-नवीन S-CROSS ला ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, लेन डिपार्चर प्रिव्हेंशन आणि अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल विथ स्टॉप अँड गो असेल. दुसरीकडे, नवीन S-Cross मध्ये आता 360 व्ह्यू कॅमेरा आणि मागे क्रॉस ट्रॅफिक सारखं विशेष पार्किंग फंक्शन्स देखील मिळेल.
  • मारुती सुझुकी जिम्नी 5-डोर – मारुती सुझुकी गेल्या काही दिवसांपासून जिम्नीच्या 5-डोर आवृत्तीवर काम करत आहे. ही एसयूव्ही पुढील वर्षी कधीही भारतात लॉन्च केली जाऊ शकते. या एसयूव्हीमध्ये तुम्हाला १.५-लीटर नॅच्युअरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळू शकते. त्याच वेळी, मारुती या एसयूव्हीला 4×4 ड्राइव्हट्रेन देऊ शकते.