नवीन गाडी दारात आल्यानंतर आपल्या जीवाप्रमाणे तिला जपतो. गाडीला साधा स्क्रॅच जरी आला तरी वाईट वाटतं. पण नव्या गाडीच्या इंजिनमध्येच काही गडबड झाली तर ते दु:ख त्यापेक्षा अधिक असतं. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने काही वाहनांसाठी विशेष सेवा मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. जर तुमच्याकडे मारुती सुझुकीची एर्टिगा, स्विफ्ट, डिझायर, सियाझ आणि एक्सएल 6 यापैकी कोणतीही गाडी असेल आणि इंजिनमधून विशिष्ट प्रकारचा आवाज येत असेल. तर तुम्हाला कंपनीकडून विशेष सेवा मिळणार आहे. या पाच वाहनांच्या ग्राहकांनी कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर या समस्येबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर ही समस्या दूर करण्यासाठी कंपनीने विशेष सेवा मोहीम आयोजित केली आहे.

ग्राहकांना एर्टिगा, स्विफ्ट, डिझायर, सियाझ आणि एक्सएल 6 कारच्या इंजिनमध्ये विचित्र आवाज येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा आवाज इंजिन माउंट्स खराब झाल्यामुळे येत असावा. यामुळे कंपनी विशेष सेवा मोहिमेद्वारे अशा वाहनांची तपासणी करेल आणि आवश्यक असल्यास पार्ट बदलेल. विशेष म्हणजे यासाठी कंपनी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. इंजिनमध्ये येणारी ही कंपनं उजव्या बाजूला असलेल्या खराब माउंट पार्ट्स क्रमांक 11610M72R00 मुळे येत आहेत. मारुती सुझुकी निवडक कारमधील ओळख क्रमांकाद्वारे ही समस्या सोडवेल. यासाठी तुम्ही तुमच्या वेबसाइटवरही संपर्क करू शकता.

  • डिझायर – MA3EJKD1S00C76583
  • स्विफ्ट – MBHCZCB3SMG838412
  • एर्टिगा – MA3BNC32SMG361698
  • इग्निस – MA3NFG81SMG319333
  • एक्लएल 6 – MA3CNC32SMG261516
  • सियाझ – MA3EXGL1S00437213

बजाज नव्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सज्ज; Ola S1, TVS iQube शी असणार स्पर्धा

२२ जुलै २०२१ पूर्वी खरेदी केलेल्या गाड्यांनाच विशेष सेवा मिळणार आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये, मोटार जनरेटर युनिट्सच्या दोषांमुळे ऑटोमेकरने १.८१ लाखांहून अधिक कार परत मागवल्या होत्या. एक्सएल 6, सियाझ, विटारा ब्रेझा, एर्टिगा आणि एस क्रॉस हे पेट्रोल व्हेरियंट मॉडेल ४ मे २०१८ ते २७ ऑक्टोबर २०२० दरम्यान बनवले होते. नोव्हेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासून सदोष पार्ट बदलण्यास सुरुवात होईल, असं सप्टेंबर२०२१ मध्ये जारी केलेल्या निवेदनात मारुती सुझुकीने म्हटले होते. त्याचबरोबर ज्या ग्राहकांकडे या गाड्या आहेत, त्यांना पाणी साचलेल्या रस्त्यावर वाहनं न चालवण्याचा सूचना दिल्या होत्या.

एका वर्षात Nissan Magnite च्या ३० हजार युनिट्सची भारतात विक्री; किंमत आणि वैशिष्ट्ये वाचा

दरम्यान, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीच्या विक्रीत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मारुती सुझुकीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये १,०८,९९१ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात १,६३,६५६ युनिट्सची विक्री झाली होती. दुसरीकडे, ऑक्टोबर २०२१ मध्ये २१,३२२ युनिट्सची निर्यात झाली आहे.