Car Finance Plan: हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये अनेक स्टायलिश आणि लांब मायलेज असलेल्या कार आहेत, त्यापैकी एक मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक मारुती बलेनो आहे, जी त्याच्या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणली जाते. मारुती सुझुकीच्या संपूर्ण तपशीलासह, तुम्हाला ही कार तिच्या इंजिन, मायलेज आणि वैशिष्ट्यांसह खरेदी करता येईल.

Maruti Suzuki Baleno Delta किंमत
मारुती सुझुकी बलेनोच्या डेल्टा प्रकाराबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जे बेस मॉडेलच्या वरचे मॉडेल आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ७,३३,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ऑन-रोड असताना ही किंमत ८,३२,८११ रुपये होते. मारुती सुझुकी बलेनो डेल्टा ऑन रोड किंमतीनुसार, ही कार रोख पेमेंटद्वारे खरेदी करण्यासाठी तुम्हाला ८.३२ लाख रुपये लागतील. परंतु फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही ही कार ७५,००० रुपयांच्या डाउन पेमेंटवर देखील मिळवू शकता.

best time to shower morning or night what time of day should you shower heres what doctors recommend read
सकाळ की रात्र; अंघोळीची योग्य वेळ कोणती? डॉक्टर काय सांगतात? वाचा….
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

(हे ही वाचा : Electric Bike: फक्त ८० रुपयांत ८००km धावणार ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; डिझाईन व फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल… )

Maruti Suzuki Baleno Delta फायनान्स प्लॅन
तुमच्याकडे ७५,००० रुपये असल्यास, ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँक तुम्हाला या कारसाठी ७,५७,८११ रुपये कर्ज देऊ शकते. या कर्जावर बँक वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.

मारुती सुझुकी बलेनोवर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला ७५ हजार रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १६,०२७ रुपये मासिक EMI जमा करावे लागेल.

Maruti Suzuki Baleno Delta फीचर्स

मारुती सुझुकीने या कारमध्ये ११९७ सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन ८८.५० bhp पॉवर आणि ११३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे. मारुती सुझुकीचा दावा आहे की ही बलेनो २२.३५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.