scorecardresearch

मारुती सुझुकीच्या नावावर पुन्हा नवा ‘विक्रीचा विक्रम’; भारतात झाली ‘इतक्या’ कोटींची विक्री

मारुती सुझुकीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

First Maruti Car 800
मारुती 800 कारसोबत उभ्या असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. (Photo-financialexpress)

भारतातली सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माती कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीच्या नावावर एक मोठी उपलब्धी जोडली गेली आहे. कंपनीने भारतात २.५ कोटी वाहनांच्या विक्रीचा आकडा पार केला आहे.

जपानची आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने सांगितले की, त्यांची उपकंपनी मारुती सुझुकी इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला २.५ कोटी देशांतर्गत विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. मारुती सुझुकी इंडियाने ९ जानेवारी २०२३ रोजी विक्रीचा हा आकडा गाठला. सुझुकीने १९८२ मध्ये मारुती सुझुकीच्या पूर्ववर्ती मारुती उद्योगासोबत संयुक्त उद्यम करारावर स्वाक्षरी केली आणि डिसेंबर १९८३ मध्ये त्यांची पहिली कार ‘Maruti 800’ सादर केली.

(हे ही वाचा : Mahindra च्या ‘या’ इलेक्ट्रिक SUV ची ५ दिवसातच झाली बंपर बुकिंग, खरेदीसाठी लागल्या रांगा )

भारतात १७ मॉडेल्सची विक्री

सध्या भारतात १७ मॉडेल्सची निर्मिती आणि विक्री केली जात आहे आणि मारुती सुझुकी अलीकडेच वाढणाऱ्या SUV मॉडेलमध्ये तसेच हायब्रीड (पेट्रोल आणि इलेक्ट्रिक) SUV मध्ये आपला पोर्टफोलिओ मजबूत करत आहे, असे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने एका निवेदनात म्हटले आहे. पेट्रोलवर चालणारे आणि सीएनजी मॉडेल लोकप्रिय करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहे. हायब्रीड आणि सीएनजी मॉडेल्सची एकत्रित विक्री सुमारे २१ लाख युनिट्स झाली आहे.

२०१९ मध्ये २ कोटींचा केला आकडा पार

मारुती सुझुकी इंडियाने फेब्रुवारी २०१२ मध्ये एक कोटी आणि जुलै २०१९ मध्ये दोन कोटी विक्रीचा टप्पा गाठला. या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने २.५ कोटी विक्रीचा आकडा गाठला आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:53 IST