scorecardresearch

Maruti Suzuki: तिसऱ्या तिमाहित मारुतीच्या नफ्यात ४८ टक्क्यांची घट, सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि महागाईचा फटका

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तिसऱ्या तिमाहितील नफ्यात घट झाली आहे.

car-sales-maruti-express-photo-1200
Maruti Suzuki: तिसऱ्या तिमाहित मारुतीच्या नफ्यात ४८ टक्क्यांची घट, सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि महागाईचा फटका (Photo- Indian Express)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तिसऱ्या तिमाहितील नफ्यात घट झाली आहे. ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या दरम्यान नफ्यात ४८ टक्क्यांची घट झाली आहे. या तिमाहित १,०४१.८ कोटी रुपयांची मिळकत झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहित याच वेळी मारुतीला १,९९६.७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि वस्तूंच्या महागाईचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर दिसून आल्याचं मारुती सुझुकी कंपनीने सांगितलं आहे.

मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, डिसेंबर २०२१ तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल किरकोळ घटून २३,२५३.३ कोटी रुपये झाला आहे. तर डिसेंबर २०२० तिमाहीत कंपनीचा महसूल २३,४७१.३ कोटी रुपये होता. तिसर्‍या तिमाहीत एकूण विक्री १३.१ टक्क्यांनी घसरून ४,३०,६६८ युनिट झाली आहे. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत ४,९५,८९७ युनिट्स होते.

स्वयंचलित गाडीकडून अपघात झाल्यास दोष कुणाचा?, संपूर्ण जगासमोर पेच

आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहित नफ्यात घट असली तरी मारुती सुझुकीचे शेअर्स मंगळवारी शेवटी ७.४२ टक्क्यांनी वाढून ८,६५०.१० रुपयांवर बंद झाला. समभागाने उच्चांकी ८,६६४ रुपये आणि नीचांकी ७,८८७.९० रुपयांपर्यंत मजल मारली. गेल्या एका वर्षातील मारुतीच्या समभागाची कामगिरी पाहिली तर त्यात केवळ १० टक्के वाढ झाली आहे. तर, गेल्या एका महिन्यात स्टॉकमध्ये सुमारे १९ टक्के वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maruti suzuki net profit down by 48 per cent q3 october 2021 to december 2021 rmt

ताज्या बातम्या