MG Comet Launch In India: MG भारताच्या देशांतर्गत बाजारात आपली सर्वात लहान आणि स्वस्त बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार ‘Comet EV’ लाँच करणार आहे. ही कॉमेट इलेक्ट्रिक कार भारतातील सर्व इलेक्ट्रिक कारपेक्षा लहान असेल, ज्याचा आकार Citroen E C3 आणि Tiago EV पेक्षाही लहान आहे. रिपोर्ट्सनुसार, या इलेक्ट्रिक कारचे फीचर्स, बॅटरी पॅक आणि रेंजबद्दल बरीच माहिती लीक झाली आहे. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया या छोट्या एमजी कारमध्ये कोणती खास वैशिष्ट्ये आहेत, व ही कधी लाँच होणार…

MG Comet EV बॅटरी पॅक आणि मोटर

रिपोर्ट्सनुसार, कंपनी दोन बॅटरी पॅक पर्यायांसह MG Comet EV लाँच करेल. यामध्ये, पहिला बॅटरी पॅक ३० kWh क्षमतेचा असेल आणि दुसरा ५० kWh क्षमतेचा असेल. या दोन्ही पर्यायांसह, सामान्य होम वॉल चार्जरशिवाय, फास्ट डीसी फास्ट चार्जिंगचा पर्याय देखील दिला जाईल.

Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा

(हे ही वाचा: टाटाच्या ‘या’ ६ लाखांच्या कारने Maruti अन् Mahindra ला पछाडलं, लोकांमध्ये आहे तुफान क्रेझ )

MG Comet EV रेंज आणि टॉप स्पीड

कंपनीने रेंज आणि टॉप स्पीडबद्दल कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही पण रिपोर्ट्सनुसार, MG Comet EV ला Wuling Air EV प्रमाणेच बॅटरी पॅक पर्याय मिळतील. एंट्री-लेव्हल व्हेरियंटमध्ये १७.३kWh बॅटरी पॅक आणि हाय-एंड प्रकारात २६.७kWh बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यांना अनुक्रमे २००kms आणि ३००kms ची अंदाजे रेंज मिळण्याची अपेक्षा आहे.

MG Comet EV वैशिष्ट्ये आणि तपशील

रिपोर्ट्सनुसार, MG Comet EV ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एसी, सीट बेल्ट रिमाइंडर, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, EBD, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इंटरनेट, वायफाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ४ स्पीकर म्युझिक सिस्टम यासारख्या वैशिष्ट्यांसह येईल.

(हे ही वाचा: संधी गमावू नका! फक्त २ हजारात घरी आणा भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर, रेंज पाहून लागेल वेड )

MG Comet EV बाह्य डिझाइन

MG Comet EV च्या बाहेरील भागाबद्दल सांगायचे तर, कंपनीने हे क्यूबिकल डिझाइनसह बनवले आहे, ज्याच्या समोर आकर्षक डिझाइनसह स्लीक एलईडी हेडलॅम्प, लांब पट्टी एलईडी DRLs सारखी आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या असलेल्या MG कॉमेट EV च्या परिमाणांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची लांबी २,५९९ मिमी, रुंदी १,५०५ मिमी, २,९७४ मिमीच्या व्हीलबेससह १,६३१ मिमी उंची आहे. ही इलेक्ट्रिक कार टाटा नॅनोपेक्षाही लहान आहे. परंतु कंपनी भारतात लाँच होणार्‍या MG Comet EV च्या आकारात आणि डिझाइनमध्ये बरेच बदल करू शकते.

MG Comet EV किंमत व लाँच

MG Motors एप्रिल २०२३ मध्ये भारतात आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Comet EV लाँच करण्याची शक्यता आहे. या कारची भारतात किंमत १० लाख ते १५ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. भारतीय बाजारपेठेत ही कार Tata Tiago EV आणि Citroen E C3 शी स्पर्धा करेल.