scorecardresearch

लॉन्चिंगपूर्वीच Hyundai Verna 2023 ची Honda City आणि Maruti Ciaz शी स्पर्धा, जाणून घ्या काय आहेत जबरदस्त फीचर्स

2023 Hyundai Verna Facelift मध्ये कंपनी १०.२५ इंचाचे दोन मोठ्या आकाराचे ड्युअल स्क्रीन सेटअप देत आहे.

2023 Hyundai Verna launch 21 march
2023 Hyundai Verna – लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ hyundai.com

Hyundai कंपनी एक कार उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. Hyundai Motor कंपनीने Auto Expo २०२३ मध्ये Ioniq 5 ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्यानंतर लगेचच त्यांनी नवीन सिरीजच्या Verna sedan साठीचे बुकिंग सुरु केले आहे. Hyundai Motors २१ मार्च २०२३ रोजी त्यांची प्रीमियम सेडान 023 Hyundai Verna Facelift बाजारामध्ये लॉन्च करणार आहे. लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने त्यातील काही फीचर्स आणि स्पेसीफिकेशनची माहिती सार्वजनिक केली आहे.

2023 Hyundai Verna Facelift मध्ये काय आहे नवीन ?

2023 Hyundai Verna Facelift मध्ये कंपनी १०.२५ इंचाचे दोन मोठ्या आकाराचे ड्युअल स्क्रीन सेटअप देत आहे. ज्यामध्ये स्वीचेबल इंफोटेनमेंट आणि वेदर कंट्रोल फिचर देण्यात आले आहे. यामधील एक स्क्रीन ही इन्फोटेनमेंट सिस्टीमची असेल तर इतर दोन स्क्रीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या असणार आहेत.

हेही वाचा : ‘इतक्या’ रुपयांमध्ये 2023 Hyundai Verna च्या बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Hyundai Verna मध्ये कंपनीने इंजिन आणि इतर फीचर्स अपडेट केले आहे. त्यातील काही फीचर्स पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. या सेगमेंटमधील फीचर्समध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, हीटेड फ्रंट सीट्स , ८ स्पिकर बोस साउंड सिस्टीम, DRLs सह एलईडी हेडलॅम्प आणि LED कनेक्ट पुन्हा डिझाइन केलेले टेल लॅम्प यांचा समावेश आहे.

Hyundai दोन इंजिन पर्यायांसह Hyundai Verna Facelift लॉन्च करणार आहे. यातील पहिले इंजिन हे १.५ लिटर चे असून एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे ११५ एचपी पॉवर जनरेट करते. या इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय असणार आहे. तर दुसरे इंजिन हे १.५ लिटरचे टर्बोचार्ज केलेलं पेट्रोल इंजिन आहे. जे १६० एचपी पॉवर जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि DCT ट्रान्समिशनच्या पर्यायासह दिले जाणार आहे.

हेही वाचा : Mercedes-Benz Price Hike: मर्सिडीज-बेंझ खरेदी करताय? घाई करा; कारण एप्रिल महिन्यापासून किंमतीत होणार ‘इतकी’ वाढ

2023 Hyundai Verna या सेगमेंटमध्ये Honda City, Maruti Suzuki Ciaz, Skoda Slavia आणि Volkswagen Virtus या कंपन्यांशी थेट स्पर्धा करताना दिसेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 16:51 IST
ताज्या बातम्या