तुम्ही महाराष्ट्रात नवीन बाईक किंवा कार खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर त्याची नोंदणी लवकरात लवकर करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे वाहन भारतीय रस्त्यावर कायदेशीररीत्या चालविण्यासाठी तुम्ही जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्याची नोंदणी करायला हवी. महाराष्ट्रात ५० हून अधिक प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. याचा अर्थ तुम्ही त्वरित जवळच्या कार्यालयात जाऊन RTO डेटाबेसमध्ये तुमच्या कारची नोंदणी करू शकता. तुम्ही असे करण्यात अयशस्वी झाल्यास, वैध नोंदणी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविल्याबद्दल तुमच्या नावावर ई-चलन जारी केले जाईल. तुम्हाला RC बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास पुढे काही सोप्या पायऱ्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नोंदणी प्रमाणपत्र, ज्याला व्हीआरसी किंवा आरसी, असेही म्हणतात. हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे; जे तुमचे वाहन सरकारी डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असल्याचे प्रमाणित करते. हे वाहनाच्या कायदेशीर मालकाची पुष्टीदेखील करते आणि वाहनाशी संबंधित महत्त्वाची माहिती प्रदान करते. जसे की, त्याचे मेक, मॉडेल, वर्ग, इंधन प्रकार, चेसिस नंबर व बरेच काही. तुम्ही तुमच्या वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरून पीयूसी एक्स्पायरी डेट, आरसी स्टेटस व इन्शुरन्स एक्स्पायरी डेटदेखील तपासू शकता. वाहन आणि मालकाबद्दलची महत्त्वाची माहिती यात असते. विशेषत: जेव्हा तुम्ही सेकंडहॅण्ड वाहन खरेदी करत असाल किंवा तपासणीच्या उद्देशाने वाहन तपशील मिळवू इच्छित असाल.

Toyota Innova Hycross Bookings Closed
मायलेज २४ किमी, ‘या’ ८ सीटर कारसाठी ग्राहकांच्या रांगा; तुफान मागणी पाहून कंपनीने केलं बुकिंग बंद, किंमत…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Best Selling SUVs
स्वस्त कार सोडून देशातील बाजारात ‘या’ ४-मीटरपेक्षा मोठ्या ५ सीटर SUV ची तुफान विक्री, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा!
Tata Tiago iCNG
किंमत ५.६५ लाख, मायलेज २८.०६ किमी, सेफ्टीतही टाॅपवर; टाटाच्या ‘या’ कारला तोड नाय, बाजारात दणक्यात विक्री
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..

आरसी ऑनलाईन कसे चेक कराल ?

तुम्ही परिवहन संकेतस्थळावर स्टेटस आणि आरसी (RC) बद्दलची माहिती ऑनलाइनही तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला पुढील पायऱ्यांमार्गे जावे लागेल.

परिवहनच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘इन्फर्मेशनल सर्व्हिस’ हा पर्याय निवडा आणि ‘Know युअर व्हेइकल डिटेल्स’वर क्लिक करा.

पुढे तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका. तुम्ही परिवहन संकेतस्थळावर नोंदणीकृत नसल्यास, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता वापरून, तुमचे खाते उघडा.

एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर वाहन नोंदणी क्रमांक टाका आणि ‘वाहन सर्च’वर क्लिक करा.

सगळ्यात शेवटी तुम्हाला RTO आणि व्हेईकल डिटेल्स दिसून येईल.

महाराष्ट्रात डुप्लिकेट RC साठी अर्ज कसा कराल?

अनेक वेळा वाहनमालकाचे मूळ नोंदणी प्रमाणपत्र हरवल्याचे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत मोटर कायद्यांचे पालन करण्यासाठी डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे अत्यावश्यक ठरते. महाराष्ट्रात डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी पुढील पायऱ्यांमार्गे पुढे पुढे जा.

परिवहनच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

‘वाहन सेवा’वर स्क्रोल करा आणि ‘डुप्लिकेट आरसी’ वर क्लिक करा.

नंतर राज्य निवडा. उदाहरणार्थ – महाराष्ट्र.

नंतर वाहन नोंदणी क्रमांक एंटर करा आणि RTO निवडा.

डुप्लिकेट आरसी पृष्ठावर, नाव, पत्ता, संपर्क तपशील इत्यादी डिटेल्स अपलोड करा.

नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर, डुप्लिकेट आरसीसाठी पेमेंट करा.

एकदा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही परिवहनच्या संकेतस्थळावर अर्ज स्थितीचा मागोवा घेऊ शकता.

महाराष्ट्रात आरसीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

महाराष्ट्रात नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खाली सूचीबद्ध आहेत :

ऑनलाइन फॉर्म

सेल्स प्रमाणपत्र

रस्ता योग्यता प्रमाणपत्र

पत्ता पुरावा

वाहन विमा प्रमाणपत्र

वाहनमालकाच्या पत्त्याचा पुरावा

वाहनमालकाच्या जन्मतारखेचा पुरावा

महाराष्ट्रात नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याचे टप्पे –

सामान्यतः वाहन नोंदणी प्रमाणपत्राची वैधता १५ वर्षे असते. या कालावधीनंतर ते कालबाह्य होईल आणि तुम्हाला भारतीय रस्त्यावर कायदेशीररीत्या वाहन चालविण्यासाठी त्याचे नूतनीकरण करावे लागेल. महाराष्ट्रात आरसी नूतनीकरणासाठी तुम्हाला खालील चरणांचे पालन करावे लागेल –

परिवहन संकेतस्थळावर क्लिक करा.

‘व्हेईकल सर्व्हिस’वर जा आणि ‘नोंदणीचे नूतनीकरण करा’वर क्लिक करा.

राज्याचे नाव एंटर करा. नोंदणी क्रमांक आणि RTO नाव प्रदान करून पुढे जा.

तसेच, इतर वैयक्तिक माहिती एंटर करा आणि कागदपत्रे अपलोड करा.

RC नूतनीकरणासाठी पेमेंट करा. त्यानंतरच आरसीचे नूतनीकरण केले जाईल.

त्यामुळे नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या RTO ला भेट देऊ शकता आणि वाहन व त्याच्या मालकाशी संबंधित सर्व माहिती मिळविण्यासाठी RC बुक देऊ शकता.