scorecardresearch

‘या’ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, हजारोंचा डिस्काउंट, तरी तीन महिन्यात विक्री शून्य, आता कंपनीने…

निसान इंडियाची लोकप्रिय कार मॅग्नाईट एकीकडे ग्राहकांची पसंती मिळवत असताना कंपनीची दुसरी कार मात्र ग्राहकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरत आहे.

nissan kicks
निसान इंडियाची भारतीय वाहन बाजारात पिछेहाट सुरू आहे. (PC : Nissan India)

जपानी वाहन उत्पादक कंपनी निसान इंडियाची भारतीय वाहन बाजारात पिछेहाट सुरू आहे. कंपनीच्या मॅग्नाईट या छोट्या कारला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. परंतु कंपनीच्या इतर कार्सकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. निसान किक्स ही कार एकेका ग्राहकासाठी तरसली आहे. त्यामुळे कंपनीने या कारसाठी बुकिंग घेणं थांबवलं आहे. कंपनीने बुकिंग घेणं कायमचं बंद केलेलं नसलं तरी काही काळासाठी कंपनी या कारसाठी बुकिंग घेणार नाही. कंपनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून केवळ मॅग्नाईटसाठी बुकिंग घेत आहे.

कंपनीने या कारचं बुकिंग थांबवण्याबद्दल अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. किक्सची विक्री थांबलेली आहे. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की, कंपनी या कारची विक्री बंद करून ही कार बाजारातून कायमची हटवू शकते.

३ महिन्यांपासून विक्रू शून्य

कंपनीने निसान किक्सची विक्री का थांबवली असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही एकदा या कारची गेल्या सहा महिन्यातील विक्री पाहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीने या कारचे १०८ युनिट्स विकले होते. तर ऑक्टोबरमध्ये या कारच्या २४२ युनिट्सची विक्री झाली होती. तर नोव्हेंबर महिन्यात कंपनी या कारचे केवळ ३ युनिट्स विकू शकली होती. कंपनी डिसेंबर २०२२, जानेवारी २०२३ आणि फेब्रुवारी २०२३ या तीन महिन्यात या कारचं एकही युनिट विकू शकलेली नाही. दुसऱ्या बाजूला कंपनीने मॅग्नाईट या कारच्या १५,२९२ युनिट्सची विक्री केली आहे.

हे ही वाचा >> ५.५४ लाखांच्या ‘या’ कारने Tata Nexon आणि Punch ला पछाडलं, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा

निसान किक्स ही कार कंपनीने २०२० मध्ये लाँच केली होती. या कारमध्ये १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. या कारची किंमत ९.५ लाख रुपये ते ११.८५ लाख रुपये इतकी आहे. कंपनीने गेल्या सहा महिन्यात या कारची विक्री वाढावी यासाठी कारवर हजारो रुपयांच्या ऑफर्स जाहीर केल्या होत्या. अलिकडेच कंपनीने या कारवर ५९,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला होता. तरीदेखील एकाही ग्राहकाने ही कार खरेदी केली नाही.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 19:22 IST
ताज्या बातम्या