देशामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसून येत आहे. फोर व्हिलर आणि टू-व्हिलर या दोन्ही प्रकारांमध्ये आता इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध आहेत. मात्र लवकरच इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटला एका नवीन आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. कारण १ जूनपासून त्यांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार इलेक्ट्रिक दुचाकींवरील FAME 2 अनुदानाची रक्कम कमी करणार आहे, ज्याचा थेट परिणाम या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीवर होणार आहे.

जर का तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Ola, Ather, Bajaj Chetak, TVS iQube आणि इतर कोणत्याही कंपन्यांच्या इलेक्टिक स्कूटर खरेदी करून ३५,००० रुपये वाचवू शकता.

Bhandara district, enthusiastic voters, hot sun, 34 percent polling, till 1 pm, bhandra lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, bhandara polling news, marathi news, polling day, voters, voters in bhandara,
भंडारा जिल्ह्यात तळपत्या उन्हातही मतदारांमध्ये उत्साह….दुपारी १ पर्यंत ३४.५६ टक्के मतदान…
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये

हेही वाचा : महिंद्राची ‘ही’ कार लवकरच होणार लॉन्च, देणार मारुतीच्या Jimny ला टक्कर

FAME 2 सबसिडी – इतिहास

FAME सबसिडी योजना २०१५ मध्ये पर्यावरणास अनुकूल वाहनांच्या उत्पादन आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आली. त्याचा दुसरा टप्पा हा १ एप्रिल २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आला व २०२२ मार्च पर्यंत वैध होता. मात्र याचा कालावधी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. सरकारने FAME 2 योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. त्याशिवाय इलेक्ट्रिक टू-व्हिलर वाहनांची मागणी वाढवण्यासाठी, अवजड उद्योग मंत्रालयाने कमाल मर्यादा ही १० हजार प्रति kWh वरून १५ हजार प्रति kWh केली आहे. ज्यामध्ये EV च्या किंमतीची कमाल मर्यादा २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे इलेक्ट्रिक टू-व्हिलर उद्योगाला खूप चालना मिळाली. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

१ जून २०२३ पासून काय बदलणार ?

१ जूनपासून इलेक्ट्रिक दुचाकींवर असणारे FAME सबसिडीला १५ हजार kWh वरून १० हजार kWh केले जाणार आहे. याशिवाय सबसिडीवरील कमाल मर्यादा ४० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत केली जाणार आहे. ओला इलेक्ट्रिक, एथर एनर्जी , बजाज ऑटो यांसारख्या अनेक ईव्ही उत्पादकांनी आधीच घोषणा केली आहे की, पुढील महिन्यापासून त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवणार आहेत. मेक आणि मॉडेलच्या आधारावर या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीमध्ये २५,००० ते ३५,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

electric scooters buy and save up rs 35,000
इलेक्ट्रिक स्कूटर्स (Image Credit- Financial Express)

हेही वाचा : एमजी मोटर्सचे ग्लोस्टर Blackstorm Edition झाले लॉन्च, क्लासिक मेटल ब्लॅक कलर थीमसह अनेक अत्याधुनिक फीचर, किंमत आहे..

इलेक्ट्रिक दुचाकींची भारतातील सध्याची किंमत

Ather ४५० Xची सध्याची किंमत दिल्लीमध्ये ९८,०७९ रुपयांपासून ते १.२८ (एक्स शोरूम )लाख रुपयांपर्यंत आहे. तर बजाज चेतकची एक्स शोरूम किंमत १.२२ लाख रुपयांपासून ते १.५२ रुपयांपर्यंत आहे. तर TVS iQube ची किंमत दिल्लीमध्ये ऑन रोड १.०६ लाख रुपये आहे. ओला इलेक्ट्रिकची मोठी लाइन-अप आहे आणि तिची S1 एअर रेंज ८४,९९९ ते १.१० लाख रुपये इतकी आहे.