Pininfarina PF40 Electric Bike: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळवला आहे. भारतात गेल्या काही महिन्यात जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच झाल्या आहेत. यात आणखी एका इलेक्ट्रिक बाईकची आता भर पडली असून महिंद्राची ६० किलोची इलेक्ट्रिक बाईक लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.

ही’ बाईक घालणार बाजारपेठेत धुमाकूळ
महिंद्रा आणि महिंद्राच्या मालकीची कंपनी पिनिनफेरिनाने डिझाईन केलेली ‘Pininfarina PF40 Electric Bike’ लवकरच बाजारपेठेत धुमाकूळ घालणार आहे.

(हे ही वाचा : मारुतीने Petrol-CNG नव्हे तर, आणली देशातील पहिली ‘Flex-Fuel’ वर धावणारी कार; कधी होणार लाँच)

स्पीड असेल’…’
जुन्या डिझाईनमधील ही इलेक्ट्रिक मोपेड युरोपातल्या रस्त्यांवर चालवण्यासाठी लायसन्सची आवश्यकता भासणार नाही, असं म्हटलं जात असून या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड ४५ किमी प्रति तास इतका आहे. ही इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज बाइक आहे.

काय असेल खास?
पिनिनफेरिनाची ही ईव्ही Eysing Pioneer इलेक्ट्रिक मोपेडवर बेस्ड आहे. Pininfarina PF40 मध्ये अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. यासह यात व्हर्टिकल रिब्ड टायर्स आहेत, जे रेट्रो आणि क्लासी दिसतात. पीएप ४० च्या गोल हेडलाइट्सभोवती एक वेगळा हेडलाइट काउल आहे, ज्यामध्ये एलईडी आणि नवीन डिझाईन देण्यात आलं आहे. या बाइकचं वजन ६० किलो इतकं आहे. ही मोपेड ११० किलोपर्यंतचं वजन वाहून नेहू शकते. या बाईकच्या दोन्ही व्हील्समध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. ही बाइक ८ तासात चार्ज करता येईल. फास्ट चार्जने ही बाइक ४ तासांत पूर्ण चार्ज होईल.

(हे ही वाचा : Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत
Pininfarina PF40 Electric Bike ची किंमत १३,७८० युरो इतकी आहे. भारतीय वाहन बाजारात या मोपेडची किंमत जवळपास १२ लाख रुपये इतकी असेल.