scorecardresearch

फक्त १५ मिनिटात फुल चार्ज होणार स्कूटरची बॅटरी; हिरो इलेक्ट्रिकचा दावा

लवकर चार्ज होणारी आणि बॅटरी लाइफ चांगली असलेल्या स्कूटरला मागणी आहे.

Hero-Electric-Scooters-
फक्त १५ मिनिटात फुल चार्ज होणार स्कूटरची बॅटरी; हिरो इलेक्ट्रिकचा दावा (Photo- Hero Electric)

भारतीय बाजारात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यात दुचाकींची मागणी सर्वाधिक आहे. रस्त्यावर आता इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात धावताना दिसत आहेत. त्यामुळे लवकर चार्ज होणारी आणि बॅटरी लाइफ चांगली असलेल्या स्कूटरला मागणी आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हिरो इलेक्ट्रिकने बॅटरी स्टार्टअप कंपनी Log9 शी करार केला आहे. हीरो इलेक्ट्रिकचा दावा आहे की, आता बॅटरी अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. यामुळे वेळेची बचत होणार आहे. एवढेच नाही तर ही बॅटरी १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकेल.

बॅटरी स्टार्टअप EV बॅटरी बनवण्यासाठी काम करत आहे. बॅटरी 9x जलद चार्जिंग, 9x चांगले कार्यप्रदर्शन, 9x कमी बॅटरी डिग्रेडेशन आणि 9x बॅटरी आयुष्य प्रदान करण्याचा दावा करते. Log9 दावा करते की RapidX बॅटरी -३० डिग्री ते ६० डिग्री तापमान श्रेणीमध्ये कार्य करू शकते आणि १०वर्षांहून अधिक काळ टिकते. सुरक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रित करून बॅटरी तयार करण्यात आली आहे. ही बॅटरी आग, अति तापमान, चार्जिंग आणि ड्रायव्हिंग परिस्थितीतही सुरक्षित आहे.

तुम्हाला नविन गाडी घ्यायची आहे का?, मग ही बातमी वाचा आणि मग ठरवा

हीरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले की, पेट्रोलच्या विपरीत, e2W वरील चार्ज मर्यादित आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग रेंज कमी होते. २०१९ मध्ये, आम्ही रेंज दुप्पट करण्याच्या पर्यायासह बाइक्स लाँच केल्या. सर्व हिरो इलेक्ट्रिक स्कूटरवर हा पर्याय देण्यात आला आहे. बॅटरी कमी वेळेत चार्ज होत असल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे. हिरो इलेक्ट्रिक या बॅटरींची विक्री आणि बॅटरी-एज-ए-सर्व्हिस (BASS) व्यवसाय मॉडेलद्वारे देणार आहे. ग्राहकांना नाममात्र मासिक दरात इन्स्टाचार्ज बॅटरी पॅक ऑफर करेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2021 at 11:36 IST
ताज्या बातम्या