scorecardresearch

Tata Motors December 2022 discounts: ‘या’ कारवर मिळतेय दमदार सूट; होणार ६५ हजारांची बचत

टाटा मोटर्स कंपनीने त्यांच्या अनेक वाहनांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेत ६५ हजारांची बचत करू शकणार आहात.

Tata Motors December 2022 discounts: ‘या’ कारवर मिळतेय दमदार सूट; होणार ६५ हजारांची बचत
टाटा मोटर्सच्या कारवर बंपर डिस्कॉऊंट ऑफर.(Photo-financialexpress)

Tata Motors Car Offers: डिसेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात अनेक कार कंपन्यांनी आपल्या कारवर डिस्काउंट ऑफर्स देणे सुरु केले आहे. या महिन्यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि वाहनांची विक्री वाढवण्यासाठी अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांवर डिस्काउंट ऑफर्स देत आहे. टाटा मोटर्स कंपनी देखील या बाबतीत मागे राहिलेली नाही. कंपनीने त्यांच्या अनेक वाहनांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेत ६५ हजारांची बचत करू शकणार आहात. या ऑफर अंतर्गत नेक्सॉन, टियागो आणि टिगोर सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर बंपर सूट मिळणार आहे.

‘या’ कारवर मिळणार बंपर सूट

  • Tata Tiago, Tigor – कंपनी तिच्या लोकप्रिय 5-सीटर हॅचबॅक Tata Tiago आणि सब-फोर-मीटर कॉम्पॅक्ट सेडान, Tata Tigor वर ३८ हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये २०,००० रुपयांची रोख सवलत, निवडक मॉडेल्सवर १५,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

(आणखी वाचा : Car Discount Offers: वाहन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! अर्ध्या किमतीत मिळतेय ‘ही’ लोकप्रिय कार; लगेच पाहा कुठे मिळतेय ही विशेष ऑफर )

  • Tata Nexon – कार निर्माता त्याच्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही, नेक्सॉन वर ५,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.
  • Tata Harrier, Safari – लोकप्रिय SUVs Tata Harrier आणि Safari वर ६५,००० रुपयांपर्यंत सूट मिळते. यामध्ये निवडक मॉडेल्सवर ३०,००० रुपयांपर्यंत रोख सवलत, ५,००० रुपयांच्या कॉर्पोरेट सूटसह ३०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.

कंपनी तिच्या EV श्रेणीवर कोणतीही सूट देत नाही, ज्यात Nexon EV Prime, Nexon EV Max, Tigor EV यांचा समावेश आहे. तसेच, कंपनीच्या पंच आणि अल्ट्रोज मॉडेल्सवर कोणतीही सूट नाही. शिवाय, कंपनीने अलीकडेच तिच्या Tiago हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन ८.४९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले आहे. या कारचे वितरण जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:42 IST

संबंधित बातम्या