भारतीय बाजारात दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्राच्या कारचा दबदबा असतो. कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सतत नवनवीन कार लाँच करत असते. सर्वच कारमध्ये कंपनी शानदार फीचर्स आणि मायलेज देत असते. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि परवडेल अशा किमतीत अनेक नवनवीन कार बाजारात आणत असते. तसेच, काही मॉडेल्स अपडेट करत असते. अशातच कंपनीने भारतीय बाजारात आपल्या एका लोकप्रिय कारचा नवीन व्हेरिएंट दाखल केला आहे.

महिंद्राने आपल्या पॉवरफुल कार XUV700 चा एक नवीन प्रकार सात सीटर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. आता MX 7 प्रकार XUV700 मध्ये उपलब्ध होईल, त्यात डिझेल इंजिन आहे. आतापर्यंत MX व्हेरियंट ५ सीटर डिझेल मॉडेलमध्ये उपलब्ध होता. तथापि, कंपनीने आपल्या मोठ्या आकाराच्या कारच्या अंतर्गत वैशिष्ट्ये आणि रंग पर्यायांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. परंतु कारची नवीन सात सीटर आवृत्ती पाच सीटर डिझेल कारपेक्षा ४०,००० रुपयांनी महाग आहे. चला तर जाणून घेऊया या नवीन कारमध्ये काय खास असणार आहे. 

Apple intelligence
‘Apple’चे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगतात पाऊल; काय आहे ॲपल इंटेलिजेंस? युजर्सना काय लाभ मिळणार?
900 Dams in Krishna Valley marathi news,
कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणे सुरक्षित, जलसंपदा विभागाकडून धरणांची तपासणी
Beneficiary of changing economic momentum Tata Banking and Financial Services Fund
बदलत्या अर्थगतीचा लाभार्थी: टाटा बँकिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड
wheat, production, import,
देशात यंदा गव्हाच्या उत्पादनात घट, तूर्त आयातीची शक्यता कमी
wheat, production, import,
देशात यंदा गव्हाच्या उत्पादनात घट, तूर्त आयातीची शक्यता कमी
patients, Fire safety, hospitals,
रुग्णांच्या जीवाशी खेळ, नागपुरातील ११९ हॉस्पिटल्समध्ये अग्निशमन सुरक्षा कार्यान्वित नाही
Mahindra XUV 3XO launch
Nexon, Sonet ची उडाली झोप! महिंद्राच्या स्वस्त SUV ला तुफान मागणी, १ तासात ५० हजार बुकींग, वेटिंग पीरियड पोहचला ६ महिन्यांवर
Agra Income tas raids
पलंग, पिशव्या अन् चपलांच्या बॉक्समध्येही ऐवज! IT च्या धाडीत सापडलं कोट्यवधींचं घबाड, अधिकारी रात्रभर पैसेच मोजत बसले!

(हे ही वाचा: ३९ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ११० किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक, पाहा यादी)

Mahindra XUV700 MX 7-Seater Diesel कारमध्ये काय असेल खास?

नवीन कारमध्ये २.२ लीटर डिझेल इंजिन असेल, कारमध्ये सात-इंचाचा MID आणि ॲनालॉग डायल आहे. Mahindra XUV700 ला ८-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन सिस्टीम मिळते, जी त्याचा लुक वाढवते. या कारमध्ये एलईडी लाइट्स, क्रूझ कंट्रोल आणि ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये कारला ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. कारमध्ये पाच रंग पर्याय आहेत. ही कार १५३ bhp चा पॉवर आणि डिझेलवर ३६० Nm टॉर्क देईल. यात इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ६ स्पीड गिअरबॉक्स आहे. कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल असेल.

Mahindra XUV 700 बद्दल देखील जाणून घ्या

XUV 700 MX, MX 7, AX3, AX5, AX7 आणि AX7L या एकूण सहा प्रकारांमध्ये येतो.
यात एलईडी हेडलॅम्प आणि सी शेप एलईडी डीआरएल आहे.
यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही उपलब्ध आहेत.
कारला ३६० डिग्री कॅमेरा आणि १८ इंच डायमंड कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
सुरक्षेसाठी कारमध्ये ७ एअरबॅग आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे.

किंमत किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने Mahindra XUV700 डिझेल MX 7 ची किंमत १५ लाख रुपये एक्स-शोरूम ठेवली आहे.