scorecardresearch

Tata Motors चा नववर्षाचा धमाका! ‘या’ कारवर मिळतेय बंपर सूट; लाभ घेण्याची मोठी संधी

Tata Motors Car Offers: टाटा मोटर्स कंपनीने या जानेवारी महिन्यात त्यांच्या अनेक कारवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

Tata Motors चा नववर्षाचा धमाका! ‘या’ कारवर मिळतेय बंपर सूट; लाभ घेण्याची मोठी संधी
Tata Motors च्या कारवर बंपर डिस्कॉउंट. (Photo-financialexpress)

Tata Motors Car Offers: नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या जानेवारी महिन्यात टाटा मोटर्स कंपनीने आपल्या कारवर डिस्काउंट ऑफर्स देणे सुरु केले आहे. या महिन्यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कंपनी त्यांच्या वाहनांवर डिस्काउंट ऑफर्स देत आहे. टाटा मोटर्स कंपनीने त्यांच्या अनेक वाहनांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या कार.

‘या’ कारवर मिळणार बंपर सूट

Tata Tigor

टाटा मोटर्स या महिन्यात कंपनीच्या हॅचबॅकच्या नवीन स्टॉकवर २०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सूट पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही व्हेरियंटवर उपलब्ध आहे.

Tata Safari

या महिन्यात कंपनी आपल्या लोकप्रिय SUV सफारीच्या नवीन स्टॉकवर ३५,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये १०,०० रुपयांची रोख सवलत आणि २५,००० रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट समाविष्ट आहे.

(हे ही वाचा : सिंगल चार्जवर पोहोचा दिल्ली ते देहरादून; ‘या’ आहेत कमी किमतीत मोठ्या रेंजची हमी देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर )

Tata Harrier

SUV Harrier वर नवीन स्टॉकवर ३५,००० पर्यंत बचत सूट मिळत आहे. सफारी प्रमाणे, यात १०,००० रुपयांची रोख सवलत आणि २५,००० रुपयांची एक्सचेंज सूट देखील समाविष्ट आहे.

Tata Tiago

कंपनीच्या हॅचबॅकच्या नवीन स्टॉकवर २०,०० रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सूट पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही व्हेरियंटवर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 20:45 IST

संबंधित बातम्या