देशातील सुप्रसिद्ध कार निर्माता कंपनी Hyundai India आपली पहिली मायक्रो SUV Exter देशांतर्गत बाजारात नुकतीच लॉन्च केली आहे. लाँच झालेल्या SUV Exter ने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. या मायक्रो एसयूव्हीला भारतीय बाजारपेठेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. Hyundai EXTER कंपनीच्या इतर मॉडेल Grand i10 Nios च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. निओसच्या धर्तीवर कंपनीची ही कार पेट्रोल व्हर्जनसोबतच सीएनजी व्हर्जनमध्येही सादर करण्यात आली आहे. नवीनतम Hyundai EXTER बाजारात उपलब्ध असलेल्या Tata Punch, Maruti Suzuki Fronx सारख्या वाहनांना टक्कर देते. त्यासाठी बुकिंगही सुरू आहे.

वास्तविक ही SUV Hyundai ची EXTERआहे, ज्याला micro-SUV देखील म्हटले जात आहे. या कारमध्ये १.०L T-GDi टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले आहे. जे १२०PS पॉवर आणि १७५Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन आधी Grand i10 Nios Turbo मध्ये देण्यात आले होते, जेथे ते १००bhp पॉवर आणि १७२Nm टॉर्क जनरेट करते.

Viral Video
Viral Video : पोलिस अधिकाऱ्याने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी घायाळ, व्हायरल होतोय व्हिडीओ
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

(हे ही वाचा : १५ वर्षापासून भारतीय लोक मारुतीच्या ‘या’ कारच्या लागले मागे, २५ लाख ग्राहकांनी केली खरेदी, मायलेज ३४ किमी )

स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम या कारमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV आहे. कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हीकल स्टॅबलिटी मॅनेजमेंट, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखी इतर फीचर्स देखील कारमध्ये मिळतात.या सेगमेंटमध्ये सनरूफचे वैशिष्ट्य पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. हे वैशिष्ट्य सामान्यतः त्याच्या वरच्या विभागात पाहिले जाते. सेगमेंटमध्ये प्रथमच एक्सेटरमध्ये सनरूफ देण्यात आला आहे. 

किंमत

या कारची एक्स-शोरूम किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. यात पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा पर्यायही मिळतो.