Bike Buying Guide: प्रवास करताना आपल्याकडे स्वत:च्या हक्काची दुचाकी असावी असे प्रत्येकाला वाटत असते. भारतामधील रस्त्यांवर फिरताना चारचाकी कारपेक्षा दुचाकी बरी पडते. मुंबईसारख्या महानगरांमध्ये ऑफिसला जाताना बहुतांश लोक बाईक किंवा स्कूटर वापरणे पसंत करतात. गावच्या ठिकाणी फिरायलाही बाईक सोईस्कर असते. मध्यमवर्गीयांद्वारे दुचाकीचा सर्वात जास्त वापर केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये बाईक विकत घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या विक्रीदरामुळे कंपन्यादेखील दुचाकींच्या किंमती वाढवत आहेत. आता महागाईमुळे नवी बाईक खरेदी करताना होणारा खर्च पूर्वीपेक्षा जास्त येतो. हा खर्च कमी व्हावा यासाठी काही ट्रिक्स वापरता येतात. चला तर मग या सोप्या ट्रिक्सची सविस्तरपणे माहिती घेऊयात..

बाईकचा विमा स्वत: काढा

मोटरबाईक खरेदी करताना विमा काढण्याचा सल्ला दिला जातो. अपघात किंवा अन्य काही कारणांमुळे बाईकचे नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडून पैसे मिळतात. अनेक शोरुममध्ये बाईक खरेदी करताना विमासेवा देखील पुरवली जाते. यामध्ये डीलर्स आपण खरेदी करत असलेल्या वाहनासाठी विमा निवडतात. अनेक ठिकाणी लोक डीलरशिप करताना विम्याचे अधिकचे पैसे घेतात. यामुळे खर्चामध्ये विनाकारण वाढ होत जाते. हे टाळण्यासाठी बाईकचा विमा स्वत:हून भरावा. कमीत कमी पैश्यांमध्ये योग्य सुविधा देणाऱ्या विमा कंपनीकडूनच विमा घ्यावा. यामुळे १० टक्के पैश्यांची बचत करता येते.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’
Porn Bots Pops Up On Screen Because You Engage With It Says Former Meta Employee
स्क्रोल करताना अचानक पॉर्नसारखे व्हिडीओ का दिसतात? मेटाच्या माजी सहसंस्थापकाच्या पोस्टमुळे नेटकरी भडकले

योग्य मॉडेलची निवड करावी

बऱ्याच तरुणांना बाईक्सचे वेड असते. नवी बाईक खरेदी करण्याआधी तुम्ही याचा वापर दैनंदिन प्रवासासाठी करणार आहात की लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी करणार आहात या गोष्टीचा विचार करा. तुमच्या उपयोगानुसार योग्य असलेल्या बाईकच्या मॉडेलची निवड केल्याचे अनेक फायदे आहेत. उदा. स्पोर्ट्स बाईक्सचा वापर प्रामुख्याने रेसिंगसाठी केला जातो. पण जर तुम्ही घर ते ऑफिस प्रवासासाठी स्पोर्ट्स बाईकचा वापर केला, तर त्या बाईकमध्ये रेसिंगसाठी असलेल्या फीचर्सचा कधीही वापर होत नाही. सोप्या शब्दात, कधीही वापर न होणाऱ्या फीचर्ससाठी विनाकारण पैसे भरावे लागते. हा विनाकारण होणारा खर्च टाळला जाऊ शकतो.

आणखी वाचा – गुढीपाडव्याचा मुहूर्तावर घरी आणा टाटाच्या ‘या’ जबरदस्त कार, मिळतोय तब्बल ६५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

सर्व्हिस सेंटर्सची उपलब्धता

मोटरबाईक व्यवस्थित राहावी, त्यातमध्ये बिघाड होऊ नये यासाठी ठराविक दिवसांनी सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते. बाईक खराब झाल्यावर किंवा तिच्यामधील एखादा भाग बिघडल्यास सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तिच्यात सुधारणा करता येते. तुम्ही खरेदी केलेल्या बाईकचे सर्व्हिस सेंटर शहरामध्ये नसेल, तर छोट्या-छोट्या कारणांसाठी गैरसोय होऊ शकते. लहानशा केबलसाठी तुम्हाला दूरच्या सर्व्हिस सेंटरला जावे लागेल. यामध्ये पैसे, वेळ दोन्ही वाया जातील. हे टाळावे यासाठी बाईक विकत घेण्यापूर्वी शहरामध्ये त्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर्स आहे का हे जाणून घ्यावे.

बाईकबरोबर मिळणाऱ्या गोष्टींची माहिती घ्या

अनेकदा डिलर्स बाईकची डिलिव्हरी देताना अनावश्यक गोष्टी जोडत असतात. या अ‍ॅक्सेसरीजमुळे खर्चामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे बाईकची डिलिव्हरी घेण्याआधी तिच्याबरोबर कोणती गोष्ट दिली जात आहे आणि त्या गोष्टींसाठी किती पैसे आकारले जात आहे याची माहिती मिळवावी. त्यानंतर आवश्यकता नसलेल्या गोष्टीबाबत डिलरशी चर्चा करावी. असे केल्याने बरेचसे पैसे वाचतील.

आणखी वाचा – Satish Kaushik Car Collection: सतीश कौशिक यांनाही होता महागड्या कार बाळगण्याचा शौक, कलेक्शन पाहून व्हाल थक्क

बाईकची काळजी घ्यावी

नवीन बाईक खरेदी केल्यानंतरही बऱ्याच गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. दर दोन महिन्यांनी, काही आठवड्यांनी बाईक सर्व्हिसिंगसाठी न्यावी. बाईकची नीट काळजी घेतल्याने ती बरीच वर्ष वापरता येते. ही एक साधी गोष्ट केल्याने दुरुस्तीसाठी होणारा खर्च टाळला जातो.