भारतात कार खरेदी करताना, तिची किंमत, वैशिष्ट्ये आणि मायलेज यावर बाबी लक्षात घेतल्या जातात. परंतु बऱ्याचदा दुर्लक्षित केले जाणारे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कारची सुरक्षा वैशिष्ट्ये आणि क्रॅश चाचणीमध्ये मिळालेले सुरक्षा रेटिंग. सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि सुरक्षा रेटिंगकडे दुर्लक्ष केल्याने अनेकदा रस्ते अपघातानंतर गंभीर नुकसान होते. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर भारतातील टॉप ३ सर्वात सुरक्षित कारचे संपूर्ण तपशील जाणून घ्या. या गाड्यांना ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.

Tata Altroz: टाटा अल्ट्रोजची कंपनीच्या सेगमेंटसह लोकप्रिय कारमध्ये गणना केली जाते. एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. चांगल्या फीचर्ससोबतच सेफ्टी फीचर्स देखील चांगले आहेत. टाटा अल्ट्रोज​​च्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे त,र समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, हाय स्पीड वॉर्निंग अलार्म, रियर पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय, ग्लोबल NCAP द्वारे घेतलेल्या क्रॅश चाचण्यांमध्ये टाटा अल्ट्रोज​​ला ५ स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे. टाटा अल्ट्रोज​​ची सुरुवातीची किंमत ५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. टॉप व्हेरियंटमध्ये ९.९९ लाख रुपयांपर्यंत जाते.

VVPat, Supreme Court, VVPat Verification,
विश्लेषण : १०० टक्के व्हीव्ही पॅट पडताळणीस नकार… सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणखी काय सांगतो? 
shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

Mahindra XUV300: महिंद्रा एक्सयूव्ही ३०० मध्यम आकाराच्या एसयूव्ही विभागातील एक लोकप्रिय गाडी आहे. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारंपैकी एक आहे.महिंद्रा एक्सयूव्ही ३०० च्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, सहा एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, हाय स्पीड अलार्म, पुढच्या सीटसाठी सीट बेल्ट रिमाइंडर आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ग्लोबल NCAP ने घेतलेल्या क्रॅश चाचण्यांमध्ये महिंद्र महिंद्रा एक्सयूव्ही ३०० ला ५ स्टार सेफ्टी रेट करण्यात आले आहे. महिंद्रा एक्सयूव्ही ३०० ची सुरुवातीची किंमत ८.१६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटवर १३.६७ लाखांपर्यंत जाते.

Maruti Suzuki April Discount: ‘या’ निवडक गाड्यांवर आकर्षक सवलत, जाणून घ्या

Tata Nexon: टाटा नेक्सन ही एसयूव्ही सेगमेंटमधील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. ही गाडी किंमत, वैशिष्ट्ये आणि स्टायलिश डिझाईनमुळे पसंत केली जाते. टाटा नेक्सनच्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, हिल होल्ड असिस्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, ग्लोबल NCAP ने घेतलेल्या क्रॅश चाचणीमध्ये या एसयूव्हीला ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. टाटा नेक्सनची सुरुवातीची किंमत ७.४२ लाख रुपये आहे जी टॉप व्हेरियंटमध्ये १३.७३ लाख रुपयांपर्यंत जाते.