टोयोटा मोटर्स आपली लोकप्रिय हॅचबॅक टोयोटा ग्लान्झा भारतात नवीन फिचर्स आणि डिझाइनसह लाँच करणार आहे. टोयोटा कंपनीने ग्लान्झा या कारचा टीझर जारी केला आहे. यातून कारचे डिझाईन आणि इंटीरियर याची माहिती मिळते.कंपनीने या कारला नवीन टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिले आहे. यात व्हॉईस असिस्टन्ससह नवीन डिझाईन आहे. याशिवाय, कंपनीने या कारचा एसी देखील बदलला आहे, तर एसी व्हेंट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमच्या खाली देण्यात आला आहे, ज्यामुळे कारच्या इंटिरिअर आणखीन आकर्षक दिसते. कंपनीने या नवीन टोयोटा ग्लॅन्झाच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, ८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच होऊ शकते. या गाडीतील फिचर्सबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. स्मार्टवॉच गाडीशी कनेक्ट करून लॉक अनलॉक करता येणार आहे.

टोयोटा इंडिया कंपनीने याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कारप्रेमींमध्ये या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून आपली पसंती दिली आहे. एक व्यक्ती आपल्या हातात स्मार्टवॉच घालून उभा आहे. लांबूनच स्मार्टवॉचमधील स्क्रिन टच करतो आणि गाडी अनलॉक करतो.

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

कारच्या इंटिरिअरमध्ये कंपनीने या कारच्या डॅशबोर्डचा सेंट्रल लेयर पियानो ब्लॅक फिनिशसह दिला आहे. डॅशबोर्डच्या खालच्या भागाला वेगवेगळ्या रंगसंगती देण्यात आल्या आहेत. डॅशबोर्ड ड्युअल टोनसह दिलेला आहे. ही कार वैशिष्ट्ये आणि डिझाइनच्या बाबतीत अगदी वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आली आहे. या कारच्या इंजिनबद्दल सांगायचे तर, कंपनी या कारमध्ये १.२ लीटर ड्युअल जेट मायलेज हायब्रिड इंजिन देणार आहे. जे ८३ पीएस पॉवर आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करेल आणि त्यासोबत ५ स्पीड मॅन्युअल आणि ४ स्पीड एएमटीचा गिअरबॉक्सचा पर्याय असेल. फीचर्सबद्दल बोलायचे तर, यात ऑटो एसी, ऑटो क्लायमेट कंट्रोल, एबीएस, ईबीडी, आयएसओ फिक्स्ड चाइल्ड सीट अँकर रीअर पार्किंग सेन्सर, नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह फीचर्स आहेत. ते अपडेट केले जाऊ शकतात. हॅचबॅक सेगमेंटमध्ये लाँच केल्यानंतर टोयोटा ग्लान्झा थेट मारुती बलेनो २०२२, ह्युंदाई i20 सारख्या कारशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे.