७ सीटर इनोव्हा ऐसपैस जागा, आलिशान इंटेरिअर आणि दमदार मायलेजमुळे भारतीय वाहन बाजारपेठेत लोकप्रिय आहे. इनोव्हाचे नवीन मॉडेल Toyota Innova HyCross MPV २५ नोव्हेंबर रोजी भारतात सादर होणार आहे. मात्र, भारतात पदार्पण करण्यापूर्वी हे वाहन टोयोटा झेनिक्स म्हणून २१ नोव्हेंबर रोजी इंडोनेशियामध्ये पदार्पण करणार आहे. त्याआधी कंपनीने वाहनाचे टिझर रिलीज केले असून त्यामध्ये या वाहनाला काही नवीन फीचर मिळाल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, टिझरमध्ये इनोव्हाला पॅनोरॉमिक सनरूफ, अ‍ॅम्बिएंट लाइटिंग आणि रूफ माउंटेड एसी व्हेंट्स मिळाल्याचे दिसून येत आहे.

इनोव्हा ही लांबीने मोठी आहे. त्यामुळे, या वाहनाचा सनरूफ देखील मोठा असू शकतो. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस मॉडेलमध्ये पहिल्यांदाच पॅनोरॉमिक सनरूफ असेल. परंतु, या वाहनाच्या टॉप व्हेरिएंटमध्येच सनरूफ मिळण्याची शक्यता आहे. मागच्या आठवड्यात जारी करण्याता आलेल्या टीझरमध्ये एसयूव्हीची सिलिहौटी दिसून आली होती. त्यातून वाहनाला मोठे व्हील आर्क आणि साइड पॅनलजवळ मजबूत कॅरेक्टर लाइन्स असल्याचे दिसून आले होते. त्याचबरोबर टोयोटाने एसयूव्हीचे पुढील भाग दर्शवणारे टिझर देखील सादर केले होते. त्यामध्ये, वाहनाला पुढे षटकोण आकाराचे ग्रील देण्यात आल्याचे दिसून आले होते.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

(ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! महिंद्राच्या ‘या’ 3 वाहनांवर मिळतंय ६२ हजार रुपयांपर्यंतची सूट, जाणून घ्या महिती)

नवीन इनोव्हा मागील बाजूस किंचित वक्र रूफलाइनसह येऊ शकते. जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या टोयोटा इनोव्हा कोरोलाच्या डिजाईनपासून हे वाहन प्रेरित असल्याचे दिसून येते. नवीन इनोव्हा एलईडी डेटाईम रनिंग लॅम्प आणि स्लिक एलईडी हेडलॅम्प्सह उपलब्ध होणार असल्याचे म्हटल्या जाते.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या पावट्रेनबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र, हे वाहन नवीन २.० लिटर पेट्रोल मील आणि हायब्रिड मोटरसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारमध्ये नवीन इन्फोटेन्मेंट स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट आणि इतर फीचर मिळण्याची अपेक्षा आहे.