Triumph India लवकरच आपल्या Street Triple R आणि Street Triple RS लॉन्च करणार आहे. १५ मार्च रोजी या बाईक्स लॉन्च कंपनी लॉन्च करणार आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे ही माहिती दिली आहे. १५ मार्च रोजी लॉन्च होणाऱ्या या दोन्ही मॉडेलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नवीन लॉन्च होणारी Street Triple R बाईकचे इंजिन हे १२० एचपी पॉवर जनरेट करते. तर Street Triple RS चे इंजिन १३० एचपी इतकी पॉवर जनरेट करते. मात्र या दोन्ही मॉडेलचे इंजिन ८० एनएम टॉर्क जनरेट करतात. Triumph कंपनीने या बाइक्समध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी गिअरबॉक्स अपडेट केला आहे. दोन्ही मॉडेलमध्ये एक अप/डाउन क्विकशिफ्टर देखील मिळतो.
या बाइक्समध्ये IMU सहाय्यक कॉर्नरिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोलचे फिचर देण्यात आले आहे. यामुळे बाईकची सुरक्षा अधिक मजबूत बनते. इतर फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या बाईक्स TM 890 Duke शी स्पर्धा करतात. तसेच Street Triple R या मॉडेलमध्ये बेसिक असा ट्रायडेंट-एस्क डिस्प्ले तर Street Triple RS ला वापरकर्त्यांना ५ इंचाचा रंगीत TFT डिस्प्ले मिळतो.
रायडींग मोडसाठी या बाईक्स तयार करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Street Triple R या मॉडेलमध्ये वापरकर्त्यांना रोड, रेन, स्पोर्ट आणि रायडर-कॉन्फिगरेबल असे चार राईड मोड मिळणार आहेत. तर RS व्हेरियंटमध्ये हे चार आणि अधिकच एक ट्रॅक मोड देखील मिळणार आहे. या बाइक्सच्या चांगल्या कामगिरीसाठी कंपनीने त्यांच्या चार राईड मोडला वेगवान थ्रॉटल मॅप देखील कनेक्ट केला आहे.
हेही वाचा : आनंदाची बातमी! Tata Motors च्या ‘या’ वाहनांवर मिळतोय भरघोस डिस्काउंट, होणार ‘मोठी’ बचत
काय असणार किंमत आणि कोणाशी करणार स्पर्धा ?
Triumph India च्या २०२३ मधील सिरीमध्ये अपडेटेड Street Triple R आणि RS च्या नवीन किंमती या थोड्या जास्त असण्याची शक्यता आहे. या दोन्ही मॉडेल्सची एक्सशोरूम किंमत ही १० ते १२ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या बाईक्स BMW F 900 R शी स्पर्धा करतील ज्यामध्ये ९०० सीसीचे इंजिन आहे. ते इंजिन १०३. २५ बीएचपी पॉवर आणि ९२ एनएम टॉर्क निर्माण करते. त्याची (एक्स शोरूम) किंमत ही १०.७७ लाख इतकी आहे.