Vintage Cars of India: मुंबई रोडचा दुसरा भुयारी बोगदा आज मंगळवारपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. मरीन ड्राइव्ह ते हाजी अली दरम्यानचा हा बोगदा आजपासून सुरू होतोय. हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला मार्ग अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा ४० ते ५० मिनिटांचा प्रवास केवळ ८ मिनिटांमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिंटेज कारद्वारे कोस्टल रोडची सोमवारी १० जून रोजी पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर, तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार मागच्या सीटवर बसलेले होते. याच निमित्ताने आज आपण अशाच व्हिंटेज कारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

८० आणि ९० चे दशक असे होते जेव्हा कार ही गरज नसून लक्झरी होती आणि काही मोजक्या लोकांकडेच कार होत्या. वाहने सुद्धा काही निवडकच होती, पण ती सर्वांच्याच पसंतीची होती. कदाचित आज आपल्याला ती वाहने रस्त्याने जाताना दिसत नसतील, पण आपल्या आठवणींमध्ये त्यांची जागा कायम आहे. या दशकात मोठ्या प्रमाणात व्हिंटेज कारला महत्त्व दिसून यायचे. बऱ्याच चित्रपटांमध्ये आपण या कार पाहिल्याच असतील. भारतीय ऑटोमोबाईल बाजार खूप जुना आणि मोठा आहे. अनेक कार मॉडेल्सनी आपली अमिट छाप सोडत येथे चांगली ओळख निर्माण केली आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही व्हिंटेज कारबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतीय बाजारपेठेत बराच काळ लोकांना खूप आवडल्या आहेत आणि ते अजूनही लोकांच्या आठवणींमध्ये आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

Kamala Harris accepts the Democratic presidential nomination
अन्वयार्थ : शिकागोचा सांगावा…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Devendra Fadnavis And Ajit Pawar News
NCP : अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, “देवेंद्र फडणवीस उत्तर द्या”, कुणाची मागणी?
extradition with India for Sheikh Hasina
शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? भारताच्या अडचणी वाढणार? प्रत्यार्पण म्हणजे काय?
loksatta sanvidhan bhan Constitution Attorney General Jallianwala Bagh massacre
संविधानभान: ‘मिस्टर लॉ’
Another mistake in Devendra Fadnavis security
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत पुन्हा चूक; नेमकं काय घडलं?
raj thackeray replied to sanjay raut
Raj Thackeray : “…तेव्हा काही गोष्टी कायमस्वरुपी त्यांच्या लक्षात राहतील”; ‘मॅच फिक्सिंगचं राजकारण करतात’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंचं प्रत्युत्तर!
Who is Preeti Sudan appointed as of the Union Public Service Commission chairperson
Preeti Sudan: माजी IAS अधिकारी प्रीती सुदान आहेत तरी कोण? UPSC च्या नव्या अध्यक्षपदी का झाली निवड? संरक्षण मंत्रालयासह अनेक खात्यांचा आहे अनुभव

(हे ही वाचा : बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी, ३० दिवसात विकल्या ‘इतक्या’ स्कूटी )

Ambassador

हिंदुस्थान मोटर्सच्या Ambassadorला कोणत्याही ओळखीची गरज नाही. राजकारण्यांपासून श्रीमंत लोकांपर्यंत ही कार पोहोचली होती. १८०० cc इसुजु निर्मित इंजिनसह ॲम्बेसेडरची शेवटची निर्मिती करण्यात आली होती. काळानुरूप बदल न केल्याने या वाहनावर त्याचा परिणाम झाला आणि हिंदुस्थान मोटर्सने तोटा सहन करून त्याचे उत्पादन बंद केले. ॲम्बेसेडरची शेवटची रेकॉर्ड किंमत ४.२१ लाख रुपये होती. देशाचे पंतप्रधान ते राष्ट्रपती यांच्या ताफ्यात या गाडीला विशेष स्थान असायचे.

Fiat Padmini

आपल्या काळातील उच्च मध्यमवर्गीय कार म्हटल्या जाणाऱ्या पद्मिनीने दीर्घकाळ लोकांच्या हृदयावर राज्य केले. तरुणांपासून कुटुंबापर्यंत सर्वांची ही पहिली पसंती असायची. या कारने भारतात प्रवेश केला. कार १००० सीसी पेट्रोल इंजिनसह आली होती. उत्कृष्ट पिकअप आणि लूक ही या कारची खासियत होती. Fiat ची किंमत १.९९ लाख रुपये होती.

Fiat 118 NE

पद्मिनीच्या यशानंतर फियाटने देशात दुसरी कार लॉन्च केली. याला मध्यम आकाराची सेडान म्हणणे चुकीचे ठरणार नाही. Fiat सारखेच इंजिन पण बदललेले फॉर्म. गाडीत एसी आणि मोठी बूट स्पेसही होती.

Contessa

हिंदुस्तान मोटर्सने अशी आणखी एक कार लॉन्च केली जी कॉन्टेसा होती. पूर्ण आकाराच्या सेडान कॉन्टेसाची लांबी हे त्याचे वैशिष्ट्य होते. ॲम्बेसेडर सारख्याच १८०० सीसी इंजिनसह आली होती. कॉन्टेसाची किंमत ५ लाख रुपयांपेक्षा थोडी कमी होती. या कारचे शेवटचे उत्पादनही २०२२ मध्ये Ambassadorसह बंद करण्यात आले होते. या गाड्या नवीन आणि चांगल्या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करू शकल्या नाहीत. मात्र, त्यांचे चाहते अजूनही आहेत आणि या दिग्गज कारची मागणी कमी झालेली नाही.