Volkswagen : जगातील लोकप्रिय कार कंपनी फॉक्सवॅगनकडून भारतात अनेक तगड्या एसयूव्ही आणि सेडान कार लॉन्च केल्या जातात. कारप्रेमी सुद्धा नवनवीन गाड्यांच्या प्रतिक्षेत असतात.आता फॉक्सवॅगन कंपनीने एकाच वेळी दोन तगड्या कार लॉन्च केल्या आहे. Taigun GT Line आणि GT Plus Sport या दोन एसयुव्ही गाड्यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. कुंटुबाला साजेशी अशा या एसयुव्ही स्पोर्टी गाड्यांची वैशिष्ट्ये आणि किंमती आपण जाणून घेणार आहोत.

फॉक्‍सवॅगननी Taigun GT Line आणि GT Plus Sport एसयुव्ही गाड्या लॉन्‍च करून यामध्ये सामान्य व्हर्जनपेक्षा अनेक हटके फीचर्स आणले आहेत. जाणून घेऊ या.

Taigun GT Line चे फीचर्स

कंपनीने Taigun GT Line गाडीला स्‍पोर्टी काळ्या रंगाची थीम दिली आहे. याचबरोबर यामध्ये १७ इंचीचे अलॉय-व्हील्स, डार्क एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, २५.६५ सेमी टचस्क्रीन, इंफोटेनमेंट सिस्टम , सहा एअरबॅग दिल्या आहेत.

हेही वाचा : टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी

GT Plus Sport चे फीचर्स

GT Plus Sport गाडीमध्ये स्मोक्ड हेडलॅम्प, कार्बन स्टील ग्रे रूफ, ग्रील, फेंडर आणि रिअर प्रोफाइल वर रेड जीटी ब्रॅण्डिंग, डार्क क्रोम डोअर हँडल आणि फ्रंट एक्सल वर रेड ब्रेक कॅलिपर्स दिले आहेत. हे ग्रील, डिफ्यूजर, ट्रॅपेजॉइडल विंग, नवीन 17 इंचीच्या अलॉय व्हील्स आणि फेंडर बॅज सारख्या गोष्टी काळ्या-आउटींग मध्ये उठून दिसत आहे.

अव्वल इंजिन

फॉक्‍सवॅगन GT Plus Sport मध्ये १.५ लीटर TSI Evo इंजिन दिले आहे यामध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सेव्हन स्पीड डीएसजी ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. Taigun GT Line मध्ये एक लीटर टर्बोचार्ज केलेले TSI इंजिन दिले आहे. याचबरोबर सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे.

जाणून घ्या Taigun GT Line आणि GT Plus Sport च्या किंमती

कंपनीकडून Taigun GT Line च्या मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिअंटच्या एक्‍स शोरूम ची किंमत १४.०८ लाख रूपये आहे. GT Plus Sport व्हेरिअंटच्या सुरुवातीला एक्‍स शोरूमची किंमत १८.५३ लाख रुपये आहे.

फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता म्हणाले की या नवीन व्हेरियंटच्या गाड्या स्पोर्टियर आणि आकर्षण लूकमुळे एक वेगळी ओळख निर्माण करेन Taigun GT Line आणि Taigun GT Plus याशिवाय Volkswagen ने Virtus ची GT Plus व्हर्जन सुद्धा या ब्रँड कॉन्फरन्समध्ये लूक समोर आणला.Virtus GT Plus वर सध्या काम सुरू आहे. या वर्षाच्या शेवटी ही गाडी लॉन्च होऊ शकते.