News Flash

तरंगणारी पेपरक्लिप

पाण्यापेक्षा जास्त घनता असणारी वस्तू पाण्यात बुडते आणि कमी घनता असणारी वस्तू पाण्यावर तरंगते. पण पाण्यात बुडणाऱ्या पेपरक्लिपला पाण्यावर तरंगायला कसे लावता येईल, ते आपण

| November 2, 2014 07:27 am

पाण्यापेक्षा जास्त घनता असणारी वस्तू पाण्यात बुडते आणि कमी घनता असणारी वस्तू पाण्यावर तरंगते. पण पाण्यात बुडणाऱ्या पेपरक्लिपला पाण्यावर तरंगायला कसे लावता येईल, ते आपण आजच्या प्रयोगातून पाहू.
साहित्य : पाण्याने भरलेले भांडे, पेपरक्लिप, टिश्यू पेपर, काडी.

bm02कृती : पाण्याने भरलेल्या भांडय़ात पेपरक्लिप टाका. ती पाण्यात बुडेल. ती पेपरक्लिप बाहेर काढून पुसून पूर्ण कोरडी करा. भांडय़ातल्या पाण्याच्या पृष्ठभागावर टिश्यू पेपर अलगद ठेवून त्यावर ती पेपरक्लिप हलकेच ठेवा (आकृती १). पेपरक्लिपला धक्का न लावता काडीने टिश्यू पेपर खालच्या दिशेला ढकला (आकृती २) आणि अलगद बाजूला करा (आकृती ३). पेपरक्लिप पाण्यावर तरंगत राहील (आकृती ४).
काडीने टिश्यू पेपर बाजूला करताना पेपरक्लिपच्या खालच्या पाण्याच्या पृष्ठभागाचा भंग होऊ न देणे महत्त्वाचे आहे. ते जमले की तुमची पेपरक्लिप नक्कीच तरंगेल!
अनेक पेपरक्लिप एकाच वेळी टिश्यू पेपरवर ठेवल्या तर काय होते? पेपरक्लिपचा आकार बदलला तर काय होते? पेपरक्लिप टिश्यू पेपरवर ठेवताना उभी ठेवली तर काय होते? पाण्याऐवजी तेलासारखा अन्य द्रव घेतल्यास काय होते? ते पाहा.
वैज्ञानिक तत्त्व : पाण्याच्या रेणूंमधल्या आकर्षणामुळे पाण्याचा पृष्ठभाग एखाद्या रबरी फुग्याच्या पृष्ठभागाप्रमाणे ताणलेला असतो. या ताणाला ‘पृष्ठीय ताण’ असे म्हणतात. टिश्यू पेपरच्या मदतीने पेपरक्लिप आपण पाण्याच्या पृष्ठभागावर अलगद सोडतो तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागाचा भंग न झाल्याने पृष्ठीय ताणामुळे ती पेपरक्लिप पाण्याच्या पृष्ठभागाकडून उचलून धरली जाते. याचाच वापर करून अनेक पाणकीटक आणि पाणकोळी न बुडता पाण्यावर चालू शकतात.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 7:27 am

Web Title: floating paperclip
Next Stories
1 मंतर जादू मोत्यांची
2 संघचारी टिटवी
3 डोकॅलिटी
Just Now!
X