‘‘आजी, केवढी फुलं आणली आहेत मामाने आज. काय करणार आहोत आपण या सगळय़ा फुलांचं?’’ छोटय़ा मुक्ताच्या डोळय़ात आश्चर्य मावत नव्हतं.

‘‘अगं,  देवीच्या पूजेसाठी आणली आहेत ना फुलं, आजी. ती व्यवस्थित ठेवायला मी काही मदत करू का?’’ रती तत्परतेने पुढे झाली.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

‘‘होऽ ये ना, आपण छान वेगवेगळय़ा डब्यात फुलं ठेवू या आणि काम करता करता थोडय़ा गप्पा मारू. या फुलांपासून काय काय करता येईल ते ठरवू.’’ आजीने मनोदय स्पष्ट केला.

‘‘पूजेसाठी खूप फुलं लागतील ना गं.’’ गौरांगीही उत्सुकतेने पुढे आली.

‘‘हो ना, मोगरा, लीली, जाई, जुई, शेवंती, सोनटक्का, गुलाब, चाफा यातली काही पूजेसाठी ठेवू. शिवाय बागेतली तगर, जास्वंद, अनंत, गोकर्ण, कर्दळची फुलं सकाळी काढून आणा हं.’’

‘‘हे दोन-तीन रंगांचे झेंडू आहेत, त्याचं काय करू या.’’ गौरांगीला प्रश्न पडला.

‘‘आंब्याची पानं अणि झेंडूची फुलं यांचं मस्त तोरण करतो आम्ही.’’ रतीने जाहीर करून टाकलं.

‘‘ए, देवीसमोर फुलांची रांगोळी काढू या, त्यासाठी रंगीबेरंगी झेंडू आणि गुलाबाच्या पाकळय़ा ठेव बरं का. थोडी तगरीची पानं पण तोडून ठेवा गं मुलींनो,’’ शेजारच्या रोहिणी मावशीने जाता जाता आठवण करून दिली.

‘‘काही मोगऱ्याचे, मदनबाणाचे गजरे सगळय़ांना केसांत माळायला लागतील.’’ आजीने आठवण करून दिली.

‘‘मला चाफ्याचं फूल हवं हं.’’ रतीने सांगून टाकलं.

‘‘मी ही चाफ्याच्या फुलाचा बॅच लावणार आहे.’ गौरांगीने कल्पकता दाखवली.

‘‘रांगोळीच्या ऐवजी ही शेवंतीची फुलं जेवणाच्या पंक्तीत प्रत्येक ताटापुढे ठेवू या का गं.’’ रतीने सुचवले.

‘‘मस्त कल्पना आहे. पूजा झाली की आरास करायला लागतील हं बरीचशी फुलं. जरबेरा, कॉर्निशन, ऑर्किडची पटकन् न सुकणारी फुलं तिथे छान दिसतील. शिवाय पूजेनंतर संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम आहे ना, त्या कलाकारांना देण्यासाठी जरबेरा आणि गुलाबाचं फूल घालून छोटे छोटे बुके तयार केले तर.. रोहिणी मावशीकडून शिकू या आपण हे.’’ आजीने खुलासा केला.

‘‘बाप रे फुलं संपून जातील ना!’’ सर्वाचं ‘हे करू ते करू’ ऐकून छोटय़ा मुक्ताला काळजी वाटली.

‘‘आणखीन काय काय करतात फुलांचं, सांगा बघू.’’ आजीने  मुलांच्या डोक्यात विचारचक्र फिरवले.

‘‘कोणत्याही समारंभात व्यासपीठाच्या मागच्या भिंतीची सजावट फुलांनीच तर करतात. लग्नात तर खूपच फुलांची सजावट करतात. दोघांची नावंही फुलांनी लिहितात. जमलेल्यांनाही फुलं वाटली जातात. बारसं असलं की पाळणा फुलांनी सजवतात. कुठल्याही ठिकाणी तसबिरींना फुलांचे हार घातले की वातावरण मस्त सुगंधी होतं.’’ गौरांगी त्या कल्पनेत हरवून गेली.

‘‘गुलाबाच्या पाकळय़ांपासून केलेला गुलकंद मला फार आवडतो. गुलाबदाणीत घालतात ते गुलाबपाणी फुलांपासूनच करत असतील ना गं आजी.’’ इति रती.

‘‘हळदी-कुंकू असलं की आपण सर्वाच्या अंगावर उडवतो ते ना गं!’’ छोटय़ा मुक्ताचा अ‍ॅक्शन रिप्ले चालू झाला.

‘‘आणि मामाच्या लग्नात गुलाबाच्या पाकळय़ांच्या पायघडय़ा घातलेल्या आठवताहेत मला.’’ कसं बरोबर आठवलं’ या विचाराने गौरांगी खुदकन् हसली.

‘‘शाळेच्या स्नेहसंमेलनात मी वनदेवी झाले होते ना तेव्हा फुलांची अंगठी,  इअरिंग, गळय़ातला हार, वाकी, कंबरपट्टा, मुकुट, नथ, बांगडय़ा आणि माझ्या मोकळय़ा केसांवर फुलांच्या माळा सोडल्या होत्या आईने. मला त्या वेळी वनदेवीच्या ऐवजी ‘सुगंधी देवीच’ झाल्यासारखं वाटलं.’’ रतीला लहानपणीची गंमत आठवली.

‘‘कुठल्याही समारंभात टेबलावर फ्लॉवर पॉट असतोच की. मला तर घरातसुद्धा रोज फ्लॉवर पॉटमध्ये वेगवेगळी फुलं ठेवायला आवडतात. त्याची मांडणी, ठेवायची जागा बदलायला आवडते. खोली वेगळी दिसते की नाही आजी. पण आई रोज फुलं आणून देत नाही. मग मी आपल्या बागेतली अनंत किंवा मधुमालती, असतील ती ठेवते. कोणाचा वाढदिवस असला की ‘बुके’ आणला नं की दुसऱ्या दिवशी त्यातली फुलं मी फ्लॉवर पॉटमध्ये मिठाचं पाणी घालून ठेवते. किती तरी दिवस फुलं छान राहतात.’’ फुलवेडी गौरांगी म्हणाली.

‘‘व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डे तसंच कोणाचंही स्वागत करताना आपण आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून फूलच देतो की.’’ रोहिणी मावशी मध्येच डोकावून जात होती.

‘‘सतत फुलांचा विचार म्हणजे ‘फुललेले क्षण’ शोधताना मजा वाटतेय ना! पृथ्वीच्या पाठीवर अगणित फुलं फुलत असतात. सर्वसाधारणपणे पिवळा, लाल, केशरी, गुलाबी, जांभळा असे ज्यांचे आकर्षक रंग असतात त्यांना सुवास नसतो, याउलट पांढरी हिरवट फुले सुवासिक असतात. कीटकांना आकर्षित करून घेण्यासाठी ही सर्व योजना असते. पुनरुत्पादन हा फुलांचा सर्वात मोठा उपयोग असतो. फुलांपासून सुगंधी अर्क तयार करण्यात येतात. त्याचा उपयोग अत्तर, परफ्युम, अगरबत्ती बनविण्यासाठी होतो. बकाण निंब, बहावा यासारखी काही फुले औषधीही असतात. केळफूल, शेवग्याची फुलं यांची भाजी केली जाते. दगडफूल, बदामफूल यांचा मसाला तयार करण्यासाठी उपयोग होतो. पळसाची फुले पाण्यात उकळून इकोफ्रेंडली होळी खेळू शकतो.’’ आजीने माहितीचा खजिना उघडला.

‘‘फुलांचे रंग, रूप, गंध, आकार यात वैविध्य असते. काहींना मोजक्या, ठरलेल्या पाकळय़ा असतात तर शेवंती, झेंडू अशा फुलांत पाकळय़ांची गर्दी असते. कदंबाचा पिवळा चेंडू म्हणजे असंख्य नरसाळय़ासारख्या फुलांचा समूहच. आंब्याच्या मोहरात दहा ते बारा हजार फुले असतात म्हणे. काही फुलं दरवर्षी ठरावीक ऋ तूत फुलतात. काही बारा महिने फुलतात. तर कारवीसारखी फुलं दर सात वर्षांनी फुलतात.’’ रोहिणी मावशीला सांगण्याचा मोह आवरत नव्हता.

‘‘गणपती बाप्पाला जास्वंद प्रिय. तसेच कळलावी या गमतीदार नावाचे फूलही त्याला आवडते. शंकराला पांढरे फूल तर पार्वतीला चक्क भेंडीचे पिवळे फूल आवडते. किती कमी आयुष्य असतं तरी त्यातही दुसऱ्यांना आनंद देण्याचं काम ती करत असतात. हे आपण लक्षात ठेवायचं, बरं का!’’ आजीने त्या दिवसापुरता समारोप केला.

सुचित्रा साठे