13 October 2019

News Flash

डोकॅलिटी

गंगेशी संबंधित काही प्रमुख नद्यांची यादी सोबत दिलेली आहे. ती तुम्हाला हे कोडे सोडवण्यासाठी उपयोगी पडेल.

(संग्रहित छायाचित्र)

ज्योत्स्ना सुतवणी

प्रत्येक भारतीय माणसाच्या मनात गंगेला अढळ स्थान आहे. बहुसंख्य लोक गंगेला माताच नव्हे तर देवी मानतात. एवढेच नव्हे, तर गंगेच्या काठावरील तीर्थक्षेत्रावर तिची रोज आरतीही केली जाते. आजचे कोडे हे गंगेच्या हिमालयापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत होणाऱ्या प्रवासावर आधारित आहे.

गंगेशी संबंधित काही प्रमुख नद्यांची यादी सोबत दिलेली आहे. ती तुम्हाला हे कोडे सोडवण्यासाठी उपयोगी पडेल. याशिवाय गंगेविषयी अधिक सविस्तर माहिती सोबत दिलेल्या िलकवर तुम्हाला पाहता येईल.  http://nmcg.nic.in/courseofganga.aspx

नद्या : यमुना, भागीरथी, धौलीगंगा, पिंडार, अलकनंदा, मंदाकिनी, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा, तमसा, सोन (शोण, पुनपुन, कमला, करछा, हुगळी, पद्मा, मेघना, ब्रह्मपुत्रा, दामोदर, नंदाकिनी

१) गंगेचा उगम गंगोत्रीजवळ झाला असे मानण्यात येते. उत्तराखंडातील हिमालयाच्या पर्वतराजीतून अनेक लहानमोठे प्रवाह गंगेला मिळतात आणि हरिद्वारपाशी गंगेचा मुख्य प्रवाह तयार होतो. सोबत दिलेल्या नद्यांच्या यादीतून हरिद्वारपूर्वी गंगेच्या प्रवाहात सामील होणाऱ्या नद्यांची नावे सांगा.

२) वाराणसीच्या जोडीने ज्या तीर्थक्षेत्राचे नाव घेतले जाते असे हे गंगा व यमुनेच्या संगमाचे स्थान उत्तर प्रदेशात आहे. येथे गंगेला मिळणारा यमुनेचा प्रवाह गंगेच्या प्रवाहापेक्षा खूपच मोठा आहे. या तीर्थक्षेत्राचे नाव सांगा.

३) उत्तर प्रदेशातून बिहार प्रांतात शिरणाऱ्या गंगेला नेपाळमधील हिमालयातून येणाऱ्या नद्या बिहार, बंगाल आणि झारखंड प्रांतात गंगेला विराट रूप देतात. या नद्यांची नावे सांगा.

४) फराक्का धरणाजवळ गंगेच्या प्रवाहाचे दोन भाग होतात. एक भाग बांगलादेशात शिरतो तर दुसरा भाग भारतातील बंगाल राज्यातून समुद्रापर्यंत वाहतो. भारतातून वाहणाऱ्या गंगेच्या या प्रवाहाचे नाव सांगा.

५) बांगलादेशात शिरणाऱ्या गंगेच्या प्रवाहास काय म्हणतात?

६) गंगा नदीचे पात्र बिहारमधे एवढे विस्तृत रूप घेते की भारतातील सर्वात लांब १० पुलांपैकी चार पूल बिहारमधील गंगेवर आहेत. या चार पुलांपैकी सर्वात लांब पुलाचे नाव काय आणि तो कोठे आहे?

७) हिमालयात शेकडो प्रवाहांतून निर्माण होणारी गंगा, प. बंगाल व बांगलादेशातील सुमारे ३५४ कि. मी. लांबीच्या जगातील सर्वात मोठय़ा त्रिभुज प्रदेशात असंख्य प्रवाहांनी बंगालच्या उपसागराला मिळते. या त्रिभुज प्रदेशाचे नाव काय आहे?

उत्तरे-

१) भागीरथी, मंदाकिनी, धौलीगंगा, िपडार, अलकनंदा, मंदाकिनी

२) अलाहाबाद

३) शोण, गंडक, कोसी, महानंदा, दामोदर, घागरा, पुनपुन

४) भागीरथी- हुगळी (उत्तराखंडात असलेले भागीरथी हे नाव नदीला बंगालमधे परत एकदा प्राप्त होते.)

५) पद्मा

६) पाटणा-हाजीपूर जोडणारा महात्मा गांधी सेतू

७) सुंदरबन

jyotsna.sutavani@gmail.com

First Published on January 20, 2019 12:41 am

Web Title: gk quiz game for kids article by jyotsna sutavani