मे महिन्यात आपल्याला ‘म’ने सुरू होणारे वैज्ञानिक शब्द ओळखायचे आहेत. त्यासाठी मदत म्हणून सूचक माहिती सोबत दिलेली आहेच.

१) जलचरांचे संग्रहालय

२) संगणकातील माहिती तार/ऑप्टिकल फायबरद्वारे पाठवण्यासाठी हे उपकरण वापरतात.

३) पृथ्वीच्या अंतर्भागातून बाहेर पडणारा तप्त शिलारस

४) प्राण्यांच्या चरबी/वनस्पतींपासून मिळणारा चिकट दाट ज्वलनशील पदार्थ

५) या ग्रहाला रेड प्लॅनेट असेही म्हणतात.

६) कडक उन्हाळ्यात जमिनीच्या/वाळूच्या ठिकाणी पाणी असल्याचा भास होणे

७) या माश्या मध साठवण्यासाठी षटकोनी कोष असलेले मेणाचे पोळे बनवतात.

८) या उपकरणाला मराठीत भ्रमणध्वनी असे नाव आहे.

९) विद्युत चुंबकत्व आणि चुंबकांतील प्रतिकर्षण या गुणधर्मावर चालणारी ट्रेन.

१०) या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो.

११) आपल्या आकाशगंगेचे दुसरे नाव.

१२) निर्जीव आणि कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा अन्न म्हणून वापर करणारे सजीव.

jyotsna.sutavani@gmail.com