एप्रिल महिन्यात आपल्याला ‘ए’ ने सुरू होणारे वैज्ञानिक शब्द ओळखायचे आहेत. त्यासाठी मदत म्हणून सूचक माहिती सोबत दिलेली आहेच.

१) मापनासाठी वापरले जाणारे परिमाण. उदा. मीटर, किलोग्रॅम.

२) अमीबा हा — जीव आहे.

३) विजेचा दिवा, फोनोग्राफ, इत्यादी अनेक शोधांचे जनक.

४) हऌड संघटनेने ‘एक डिसेंबर’ हा ‘जागतिक — दिन’ म्हणून जाहीर केला आहे.

५) संदेशग्रहण आणि संदेशवहन करण्यासाठी वापरले जाणारे साधन.

६) उत्तर ध्रुवाजवळ बर्फाच्या घरात (इग्लू) राहणारे लोक.

७) दातांवर असलेले आवरण.

८) प्रक्रिया करून तयार केलेले काळसर रंगाचे कठीण रबर.

९) जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्याचे माप.

उत्तरे : १) एकक २) एकपेशीय ३) एडिसन ४) एड्स ५) एरियल ६) एस्किमो ७) एनॅमल

८) एबोनाइट ९) एकर.

 

– ज्योत्स्ना सुतवणी

jyotsna.sutavani@gmail.com