साहित्य : दोन विरुद्ध रंगांचे कागद, कात्री, गम.
कृती : दोन्ही विरुद्ध रंगांचे कागद लहान व मोठे चौरस आकारात कापून घ्या. साधारण ८ ते १० तुकडे लागतील. एका फुलासाठी जो रंग आतील बाजूस हवा त्याचे छोटे चौकोन करा व बाहेरील बाजूचे चौकोन १ सें.मी मोठय़ा आकारात कापा. सर्व (लहान-मोठे दोन्ही चौकोन) त्रिकोणात दुमडून घ्या. त्रिकोणाची विरुद्ध टोके गम लावून जोडा व पाकळ्या बनवा. लहान पाकळी आत व मोठी पाकळी बाहेर अशा क्रमाने जोडणी करा. मग सगळ्या पाकळ्या एकत्र जोडून फूल बनवा. दोन रंगाच्या फुलामध्ये बाहेरील रंगाची गोल गुंडाळी चिकटवा.

– अर्चना जोशी
muktakalanubhuti@gmail.com