साहित्य : वर्तमानपत्रांचे कागद (रद्दी), अ‍ॅक्रिलिक रंग, गम, ब्रश इ.
कृती :  रद्दी वर्तमानपत्रांचे दुपदरी मोठे पान एका बाजूच्या कोनातून गुंडाळून छडी (लांब पातळ गुंडाळी) बनवा.  अशाप्रकारे कागदांच्या ७ ते ८ गुंडाळ्या करून छडय़ा बनवा. सर्व छडय़ा एक एक करून गोलाकारात गुंडाळत गुंडाळत गमच्या साहाय्याने जोडत मोठ्ठे भेंडोळे तयार करा. सर्व गुंडाळ्या एकमेकांमध्ये घट्ट ओढून गुंडाळा, जेणेकरून मध्येच पोकळी होणार नाही. हे मोठ्ठे भेंडोळे कडकडीत वाळू द्या. नंतर गडद रंगात (अ‍ॅक्रिलिक रंग वापरा) रंगवा व पुन्हा चिकटपणा सुकेपर्यंत वाळू द्या. आवश्यक वाटल्यास  टिकल्यांनी सुशोभित करा. झाली आपली झटपट कागदी टोपली तयार. यामध्ये आपण फळे किंवा सुका खाऊ, चॉकलेट्स ठेवू शकतो किंवा गिफ्टही देऊ शकतो.