गौरी कुलकर्णी
जीवन जगले देशासाठी
देशच त्यांचा होता प्राण
स्वतंत्र केली भारतमाता
ते गांधीजी थोर महान
अहिंसेचे खरे पुजारी
सत्य बोलणे त्यांचा बाणा
राहणी साधी, विचार उच्च
हीच शिकवण दिली साऱ्यांना
‘चले जाव’ हा नारा घुमवून
इंग्रजांना केले भयभीत
स्वदेशीचा आग्रह धरूनि
सदैव जपले देशाचे हित
साबरमतीच्या या संताने
शांतीचा अन् मंत्र गायिला
मिळून सारे करू या नित्य
प्रणाम त्यांच्या कर्तृत्वाला
प्रणाम करूनि नको थांबू या
शांतीने राहू या आपण
वागण्यात प्रत्यक्ष आणू या
बापुजींची अमूल्य शिकवण
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2018 12:11 am