पावसाच्या सरी
पडतात अंगणी,
अंगणातील खड्डय़ात
साचते पाणी॥

पाण्यात सोडली जाते
कागदी नाव,
नाव चालते
झोकात छान॥

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
pune vegetable prices marathi news, pune vegetable prices today marathi news
पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…

आवडते आम्हास
पावसात भिजणे,
पण आईचे असते
नेहमीच ओरडणे॥

आई का कधी
लहान नव्हती
ती कधी काय पावसात
भिजतच नव्हती?

आई, ओरडणे सोड!
भिजू दे पावसात,
तू ही ये! भीज,
परत ये बालपणात॥
– वसंत खेडेकर

पावसातली मजा
धो धो धो धो पाऊस आला
नदी – नाल्यांना पूर आला

चला चला रे बाहेर जाऊ
रिमझिम पावसात मस्त भिजू

डबक्यात खेळ नि गंमत करू
निसरडय़ा जागेत घसरण करू

कागदी होडय़ा छान छान करू
ओहळात त्या अलगद सोडू

येईल ज्याची नौका पहिली
देऊ त्याला चॉकलेट गोळी
– राजेश काळे